Sugarcane Farmers protest  Dainik Gomantak
गोवा

Sugarcane Farmers Protest: ....त्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही! संतप्त ऊस उत्पादकांचा आक्रमक पवित्रा

इथेनॉल प्रकल्प होणार की नाही हे सरकारने लेखी स्वरूपात देण्याची मागणी

Kavya Powar

Sugarcane Farmers Protest: मागील काही दिवसांपासून राज्यात संजीवनी साखर कारखान्याचा विषय गाजत असून संजीवनी धारबांदोडा येथे उद्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्ववत चालू करणे, ऊस शेतीला प्राधान्य देणे आणि ऊस उत्पादकांना नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर देणे या प्रमुख मागण्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे.

दरम्यान, अखेर आज (17 जुलै) ऊस उत्पादकांनी संजीवनी साखर कारखान्याच्या गेटसमोर जमाव करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली. जोवर सरकार आपली मागणी पूर्ण करत नाही, तोवर आंदोलन थांबवणार नसल्याचा इशारा संतप्त उत्पादकांनी दिला आहे.

इथेनॉल प्रकल्प होणार की नाही हे सरकारने लेखी स्वरूपात दिले पाहिजे, अशी चेतावणी त्यांनी दिली असून इथून हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

याआधीही सरकारने खोटी आश्वासने दिली होती; मात्र यावेळी आम्ही पुन्हा यामध्ये अडकणार नाही. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडून लेखी स्वरूपात उत्तर आल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचे मत एका ऊस उत्पादकाने व्यक्त केले आहे.

तसेच,ऊस उत्पादकांनी आक्रमक पावित्रा घेतला असून 3 वाजता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा घेतला निर्णय घेतला आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे अशी मागणी उत्पादकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT