Coconut Cultivation Dainik Gomantak
गोवा

सांगे तालुक्यात नारळ लागवडीमुळे ऊस पीक धोक्यात

‘संजीवनी’चे भवितव्य अंधारात: सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत

दैनिक गोमन्तक

सांगे: सांगे तालुक्यातील व खास करून साळावली धरणग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे ऊस पीक. या ऊस पिकावर गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांबाळांचे शिक्षण पूर्ण केले. ऊस नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाशिवाय अन्य पिकाकडे वळण्याचा विचार केला नव्हता. मात्र, आता संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी नारळ व पोफळी लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे संजीवनी साखर कारकाना सुरू झाला तरी ऊस मिळणे मुश्कील होणार आहे.

खारखाना बंद असला, तरी ऊस लागवड करू किंवा न करू शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे प्रति टन दर देणार असल्याचे संजीवनी कारखान्याने सुरवातीला जाहीर केले होते, परंतु नंतर फक्त ऊस लागवड करणाऱ्याच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऊस पिकाला मिळणारी तुटपुंजी रक्कम परवडणारी नसल्याने शेतकऱ्यांनी नारळ आणि पोळीच्या लागवडीवर भर दिला आहे. ही स्थिती केवळ सांगेतच नसून राज्यभर हेच चित्र निर्माण झाल्याने संजीवनीचे भवितव्य अंधारमय झाले आहे.

सर्वाधिक ऊस पीक लागवड सांगे भागात केली जात होती. साळावली धरण निर्मिती करताना उपजीविकेचे साधन म्हणून प्रत्येक धरणग्रस्ताला दहा हजार चौरस मीटर जमीन देण्यात आली. गेली अनेक वर्षे कष्टकरी समाज ऊस पीक लागवड करीत आपला उदरनिर्वाह करीत आले. काहीजणांना ऊस पिकाशिवाय अन्य पर्याय नाही. काहीजणांना सरकारी नोकऱ्या आहेत, तर कित्येकजणांना कुटुंब मोठे असल्यामुळे एकाच भूखंडावर उपजीविका करण्यावाचून पर्याय नाही. आज ऊस पीक बंद झाल्याने शेकडो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकत्र कुटुंब असलेल्यांनी आता भूखंडांची विभागणी करून ऊस पिकाला भविष्य नसल्याने आणि संजीवनी साखर कारखाना नव्याने सुरू होण्याची आशा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे समूळ उच्चाटन करून नारळ, सुपारी लागवड सुरू केली आहे.

आता ऊस पिकासाठी दिलेल्या भूखंडात नारळ आणि पोफळी किंवा अन्य पीक घेण्यासाठी सुरवात केली, तर उत्पादन मिळण्यासाठी तब्बल किमान पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्यामुळे ज्यांना उत्पन्नाचा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT