Sudip Tamhankar Attack Dainik Gomantak
गोवा

Sudip Tamhankar Attack: म्हापशात खळबळ! बसमालक नेते सुदीप ताम्हणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं गाठलं

Attack on Bus Leader Goa: सुदीप ताम्हणकर हे शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरुन म्हापसा कदंब बसस्थानक परिसरातून जात होते.

Manish Jadhav

म्हापसा: 'अखिल गोवा खासगी बसमालक असोसिएशन'चे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांच्यावर शनिवारी (24 जानेवारी) दुपारी म्हापसा कदंब बसस्थानक परिसरात 7 ते 8 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात ताम्हणकर जखमी झाले असून भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे म्हापसा शहरात मोठी खळबळ उडाली. बेकायदेशीर बस वाहतुकीविरोधात आवाज उठवल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

सुदीप ताम्हणकर हे शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरुन म्हापसा कदंब बसस्थानक परिसरातून जात होते. यावेळी सात ते आठ जणांच्या एका गटाने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. संशयितांनी ताम्हणकर यांच्या चालत्या दुचाकीला अडवून त्यांना गाडीसह जमिनीवर पाडले. त्यानंतर या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. केवळ मारहाण करुन न थांबता, हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीवर लाथा मारल्या आणि ताम्हणकर जखमी अवस्थेत असताना त्यांचे व गाडीचे फोटोही काढले. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.

बेकायदेशीर वाहतुकीचा मुद्दा कारणीभूत?

ताम्हणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका विशिष्ट 'टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स' कंपनीच्या बसेसविरोधात तक्रार केली होती. या बसेस योग्य नोंदणीशिवाय बेकायदेशीरपणे आंतरराज्य बस सेवा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याच रागातून संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीशी संबंधित व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केल्याचा संशय ताम्हणकर यांनी व्यक्त केला. परिवहन खात्याकडे तक्रार केल्यामुळेच आपल्या मार्गात आडकाठी निर्माण करण्यात आली, असेही त्यांनी नमूद केले.

पोलीस तक्रार आणि तपास

या गंभीर घटनेनंतर ताम्हणकर यांनी तात्काळ म्हापसा पोलीस (Police) ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. बसमालक संघटनेच्या नेत्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्यामुळे बसमालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी असोसिएशनने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zambaulim: सफर गोव्याची! श्री दामोदरांचा आशीर्वाद लाभलेले, निसर्गसंपन्न 'जांबावली' गाव

Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी

Indonesia Landslide: रात्री गाढ झोपेत असताना 'काळ' आला! इंडोनेशियात भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू; 80 हून अधिक बेपत्ता VIDEO

IND vs NZ: 'तू इंडियासाठी खेळण्यास लायक आहे का?' धडाकेबाज खेळीनंतर ईशान किशननं सांगितला स्वतःला सिद्ध करण्याचा थरार

America Winter Storm: अमेरिकेत 'बर्फाचा प्रलय'! 8000 उड्डाणे रद्द, 14 कोटी लोकांवर मृत्यूचे सावट; ट्रम्प यांनी पुकारली आणीबाणी VIDEO

SCROLL FOR NEXT