Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa: "राज्यातील ऑनलाईन शिक्षणपध्दती बंद करावी"

24 जुलै रोजी पणजीच्या (Panjim) आझाद मैदानावर मगो कार्यकर्त्यांसोबत धरणे आंदोलन धरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: शिक्षणात राजकारण न आणता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने सुरू केलेली ऑनलाईन शिक्षण (Online Education) पध्दत विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असून त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. सरकारने जोपर्यंत नेटवर्क समस्या सुटत नाही तसेच विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, तोपर्यंत राज्यातील ऑनलाईन शिक्षणपध्दती बंद करावी, अशी मागणी मगोचे मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी निवेदन दिल्यानंतर माहिती मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत केली. 24 जुलै रोजी पणजीच्या आझाद मैदानावर मगो कार्यकर्त्यांसोबत धरणे आंदोलन धरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (Sudin Dhavalikar has demanded that online education system in the state should be stopped)

यावेळी कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, मगोचे नेते केतन भाटीकर, फोंडा मगोचे गटाध्यक्ष अनिल नाईक, बांदोडा सरपंच राजेश नाईक, मगोचे केंद्रीय समितीचे खजिनदार आनंद नाईक, मडकई, बांदोडा, दुर्भाट, वाडी-तळावली, कवळेचे पंच सदस्य आणि मगोचे कार्यकर्ते उपस्थित होते.फोंडा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पंचवाडकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्या कार्यालयात ढवळीकर यांनी निवेदन सादर केले.

सध्याचे सरकार शिक्षणाबाबत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना जंगलात, डोंगरावर व उंच झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच नेटवर्कसाठी वणवण भटकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. कोरोना काळात अनेक पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

अधिवेशनात लक्ष्यवेधी सूचना आगावू विधानसभा अधिवेशनापर्यंत सर्व आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पणजीतील आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. अधिवेशनातही यासंदर्भात लक्ष्यवेधी सूचना मांडण्यात येईल. ती जर मंजूर झाली नाही तर तिथेच ठिय्या मांडून बसू, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सिध्दार्थ नाईक, आदित्य ढवळीकर यांनी, ग्रामीण भागात ऑनलाईन सेवा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT