पणजी : मगोप आणि तृणमूल काँग्रेसची युती तुटण्यासंदर्भात पसरलेले वृत्त खोटे आहे. मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठीच काही राष्ट्रीय पक्षांकडून अशा बातम्या पेरण्याचं काम सुरु असल्याचा घणाघात मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. मगो-तृणमूल युती कायम राहील आणि गोव्याच्या राजकारणात निश्चित बदल घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Sudin Dhavalikar News Updates)
मगो आणि तृणमूल काँग्रेसची युती संपुष्टात येत असल्याच्या चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तृणमूल काँग्रेसची साथ सोडून मगो पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळेच भाजपची उमेदवार यादीही लांबली होती. भाजपकडून (BJP) मगोला त्यांना हव्या असलेल्या जागा देण्याचं आश्वासनही दिलं गेल्याची माहिती होती. भाजपचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्याचंही बोललं जात होतं. मात्र या सर्व गोष्टी निराधार आणि तथ्यहीन असल्याचं अखेर सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान तृणमूल काँग्रेसने (TMC) मंगळवारी आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ज्यात तृणमूलचे विद्यमान खासदार लुईझिन फालेरो यांना फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र फालेरो फातोर्ड्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे. लुईझिन फालेरो यांच्याविरोधात फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) विजय सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता गोव्याचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जाईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.