Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

तृणमूलसोबत असताना भाजपला पाठिंबा देणार का? ढवळीकर म्हणतात....

गोव्याचं राजकारणच वेगळं असल्याचं सुदिन ढवळीकरांचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल अगदी आठवड्याभरात लागणार आहे. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संख्याबळ कमी पडल्यास त्याची जमवाजमव कशी करायची याची रणनीतीही आतापासूनच बांधण्यास सुरुवात झाली आहे. यातच लहान प्रादेशिक पक्षांना मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे. गोवा फॉरवर्डची काँग्रेसशी आघाडी असल्याने आता मगोप नेमकं कुणाच्या गोटात सामील होतोय, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. त्यातच आता मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी भाजपला पाठिंब्यावरुन मोठं विधान केलं आहे. (Sudin Dhavalikar News Updates)

गोव्यात मगोपची तृणमूलशी (TMC) आघाडी आहे. एका वृत्तवाहिनीने सुदिन ढवळीकरांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तृणमूलसोबत असताना भाजपला पाठिंबा द्याल का? यावर ढवळीकरांनी गोव्यातील राजकारण वेगळं असल्याचं सांगत पाठिंब्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजप आणि तृणमूल एकमेकांचे कट्टर विरोधक पक्ष आहेत. मात्र गोव्यात काहीही होऊ शकतं, कारण गोव्याचं राजकारणच वेगळं असल्याचं सूतोवाच सुदिन ढवळीकरांनी केलं आहे.

दरम्यान काँग्रेसने (Congress) नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. यात भाजपकडून काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला. दरम्यान मगोप आणि गोवा फॉरवर्डला भाजपने लाथ मारुन हाकलल्याचंही मायकल लोबोंनी म्हटलं होतं. तसंच कुठल्याही परिस्थितीत भाजपला (BJP) पाठिंबा मिळणार नाही असा दावाही केला होता. मात्र सुदिन ढवळीकरांच्या नव्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT