Purument Fest Dainik Gomantak
गोवा

Purument Fest In Madgaon: ‘एसजीपीडीए’वर ‘पुरुमेंता’ची जय्यत तयारी

100 ते 150 स्टॉल्स : मडगाव पालिकेला यंदा 30 लाख रुपये महसूल मिळण्याचा अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

Purument Fest रविवार, 28 रोजीपासून मडगावात पुरुमेंताच्या फेस्ताला सुरवात होत आहे. हे फेस्त मडगाव नगरपालिकेच्या पार्किंग जागेत व एसजीपीडीए मैदानावर भरविण्यात येणार आहे.

एसजीपीडीए मैदानावर जास्त करून फर्निचरची दुकाने, मुलांसाठी जायंट व्हील, अम्युजमेंट पार्कची व्यवस्था करण्यात आली आहे. एसजीपीडीएच्या या मैदानावर कमीतकमी 100 ते 150 दुकानदारांनी आपली दुकाने थाटण्यास सुरवात केली आहे.

यंदा या फेस्तमधून एसजीपीडीएला किती महसूल मिळेल हे कळलेले नाही. पण काही दुकानदारांनी सांगितले की, एसजीपीडीए 40 रुपये प्रतिचौरस मीटर असे भाडे आकारणार आहे.

मात्र, नगरपालिकेला एसजीपीडीएकडून प्रतिदिन 55 हजार रुपये मिळणार आहेत, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. यात ५ हजार रुपये कचरा उचलण्यासाठीच्या शुल्काचा समावेश आहे.

मडगाव पालिकेला मात्र आपल्या पार्किंग जागेतील फेस्तफेरीमुळे 30 लाख रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात एसजीपीडीएकडून मिळणाऱ्या महसुलाचाही समावेश आहे.

गतसाली 35 लाख 997 रुपये एवढा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता, अशी माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

शुक्रवारी (ता.26) फेस्त फेरीतील स्टॉल्सवाले भाडे कमी करण्याची मागणी घेऊन नगराध्यक्षांच्या भेटीला आले होते. त्यावेळी नगराध्यक्षांनी त्यांना सुनावले की, अजून आपण जीसुडाला जागा सुपुर्द करण्याच्या फाईलवर सही केलेली नाही.

जर केली असती तर यंदा फेस्त फेरी भरविता आली नसती. शिवाय ज्या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्याला आपण फेस्त फेरीसाठी राजी केले आहे. नगरपालिकेलाही जास्तीत जास्त महसुलाची आवश्यकता आहे. महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच अडीच कोटी रुपये लागतात, असेही नगराध्यक्षानी सांगितले.

पार्किंग प्लाझासाठी पालिकेवर दबाव

जुन्या मार्केटमध्ये कोलवा सर्कलपाशी पार्किंग प्लाझासाठी जी जागा मडगाव पालिकेने राखून ठेवली आहे. त्या जागेवर फेस्त फेरी आयोजित करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.

एका नागरिकाने तर आपल्या वकिलामार्फत कायदेशीर नोटीसच पाठविली आहे. पार्किंग प्लाझाची पायाभरणी लवकरात लवकर करावी यासाठी नगरपालिकेवर दबाव आहे. याच जागेवर फेस्त फेरी भरत आहे.

8 दिवसांचे फेस्त

यंदा पुरुमेंताचे फेस्त केवळ 8 दिवसांचे असेल. एकही दिवस ज्यादा तिथे स्टॉल्स दिसणार नाहीत, अशी ग्वाही स्टॉल्सवाल्यांनी नगराध्यक्षांना दिली आहे. आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस फेरी चालू ठेवण्यास नगरसेवकांनीही विरोध दर्शविला आहे.

त्यामुळे रविवार, 28 रोजी सुरू होणारे फेस्त पुढील रविवारपर्यंतच असेल. सोमवारी स्टॉल्सवाल्यांना आपले साहित्य उचलण्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

अजूनही जागा पालिकेकडेच

पार्किंग प्लाझा उभारण्याची जबाबदारी जीसुडावर (गोवा राज्य नगर विकास एजन्सी) सोपविण्यात आली आहे. मात्र, जीसुडाने अजून पार्किंग प्लाझाचा नियोजित आराखडा नगरपालिकेला दिला नसल्याने नगरपालिकेने ही जागा पार्किंग प्लाझासाठी जीसुडाकडे सुपुर्द केलेली नाही. फाईल अजूनही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT