Success Story Of Goa Strawberry Farmers Video | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे गोव्यात उत्पादन, CM सावंत यांनी शेअर केली वेर्ले गावच्या शेतकऱ्यांची यशोगाथा Video

कधीकाळी खाण क्षेत्र असलेल्या नेत्रावळी येथील वेर्ले गाव्यात चक्क स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. यातून शेतकऱ्यांनी चांगेल उत्पन्न मिळतेय.

Pramod Yadav

Success Story Of Goa Strawberry Farmers

गोवा म्हटलं की प्रामुख्याने पर्यटन ठिकाण अशीच प्रतिमा समोर येते मग प्रसिद्ध बीच, निसर्गसौंदर्य आणि सीफूड यांचाही प्राधान्याने उल्लेख होतो. गोव्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. खाण क्षेत्र आणि समुद्राच्या पाण्यामुळे होणारी खारफुटी यामुळे इतर पिकांना पोषक वातावरण मिळत नाही.

पण, कधीकाळी खाण क्षेत्र असलेल्या नेत्रावळी येथील वेर्ले गाव्यात चक्क स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. यातून शेतकऱ्यांनी चांगेल उत्पन्न मिळत असून, शेतकऱ्यांची यशोगाथा खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शेअर केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वेर्ले गावात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा शेअर केली आहे. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा अभियानाचा एक भाग आणि स्वयंपूर्ण मित्रांच्या मदत व अटल ग्राम विकास एजन्सीच्या सहकार्याने या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केलीय.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून सुरुवातीला 33,000 सॅपलिंग्ज आणले, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर घेऊन जात प्रशिक्षण देण्यात आले. वेर्ले गावातील जवळपास 40 ते 50 घरांतील लोकांना या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

व्हिडिओत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी दीड किलोमीटर अंतरावरुन पाणी आणले आहे. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा अभियानाच्या अंतर्गत अटल ग्राम विकास एजन्सीचा चांगला फायद्या झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

स्ट्रॉबेरी शेतीतून चार ते साडेचार हजार युनिट उत्पादन होण्याची शक्यता असून, 6 ते 7 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

स्वयंपूर्ण गोवा अभियानाचा गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. अशा पद्धतीने सरकारने योजना राबविल्यास सर्वसामान्य लोक स्वयंपूर्ण होतील, असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: 'रवी नाईक' यांचे कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे! फोंड्यातील शोकसभेला तुडुंब गर्दी; गोमंत विभूषण पुरस्कार देण्याची मागणी

'कोमुनिदाद, सरकारी जमिनींमध्‍ये घरे बांधू देणे तत्‍कालीन सरकारची चूक', CM सावंतांचा दावा; 'म्हजे घर'विरोधात कोर्टात न जाण्याचे आवाहन

Goa Rain: ‘मोंथा’चा गोव्‍यालाही बसणार फटका! आणखी 3 दिवस मुसळधार, वेगवान वारे वाहणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Caranzalem Beach:गोव्यात ‘ओशेनमॅन’ स्पर्धा मच्छिमारांनी रोखली, मिलिंद सोमणसह स्पर्धकांना फटका; आयोजकावर फसवणुकीचा गुन्हा Watch Video

Horoscope: घरात मंगलकार्याची चर्चा,कामात थोडे अडथळे येऊ शकतात; संयम ठेवा

SCROLL FOR NEXT