Goa Agriculture : पुरण शेती पुनर्जीवित करून घडविला इतिहास : प्रा. भूषण भावे

Goa Agriculture : धावे तार येथे विद्यार्थ्यांनी घेतला भात रोपणीचा अनुभव
Valpoi
Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture : वाळपई, सत्तरीत. डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली पुरण शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत असल्याने गावागावात पुन्हा पुरण शेती सुरु होणार प्रेरणा मिळेल.

त्यामुळे सर्वांनी मिळून या पुरण शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवूया असे पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण भावे यांनी सांगितले.

धावे तार, सत्तरी येथे गोवा विद्यापीठ कोकणी विभाग, शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य मंडळ आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ साळगावच्या संयुक्त विद्यमाने दुऱ्याची कोंड, धावे तार येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पुरण उत्सवावेळी भावे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गोवा जैवविविधता मंडळ, साळगांवचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम, वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, पुरण शेती प्रकल्पाचे डॉ. प्रकाश पर्येकर, शेतकरी तुळशीदास गावकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रदीप सरमोकादम म्हणाले, पुरण शेती बहरु लागल्याने त्याचा प्रत्यक्ष आनंद घेता येत आहे. आपली शेती, नदी व निसर्ग आपण टिकून ठेवला पाहिजे.

यावेळी विश्वनाथ गावस यावेळी गोवा विद्यापीठ, केपे येथील महाविद्यालय व सावर्डे तार सत्तरी येथील ज्ञान सागरच्या मुलांनी पुरण शेतीत उतरून भात रोपणीचा अनुभव घेतला.

Valpoi
Today's Goa News : दिवसभरातील ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पुरण शेती जगण्याचा आधार : पर्येकर

डॉ. प्रकाश पर्येकर म्हणाले की, पुरण शेतीबद्दल आपल्याला आपुलकी आहे. पूर्वजांनी आमच्यासाठी दिलेली देणगी होती, मात्र ती नामशेष झाल्याबद्दल खंत वाटत होती. आपल्या लेखणीतून पुरण शेतीचा लढा लढला.

पुरण’ कादंबरीतून पारंपरिक पुरण शेतीच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या केल्या. सत्तरीतील भूमिहीन शेतकऱ्यांसाठी पुरण शेती ही जगण्याचा आधार होती. त्यामुळे सत्तरीत पुन्हा शेती सुरु व्हावी यासाठी आपले नेहमी प्रयत्न होते.

आपले मोठे भाऊ गणेश पर्येकर, तुळशीदास गावकर, फटी गावकर, लक्ष्मण गावकर तसेच इतरांनी सहकार्य केल्याने आज या शेतीला नवी संजीवनी प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com