Chinmayi Prabhudesai Success Story Dainik Gomantak
गोवा

Success Story: खेडेगावात जन्मलेली मुलगी 'कर्करोगा'वर करतेय संशोधन, गोव्याच्या 'चिन्मयी प्रभुदेसाई'च्या यशाची कहाणी

Chinmayi Prabhudesai: गोव्यातील तरवळे-शिरोड्यासारख्या साधारण खेडेगावात पंचवीस तीस वर्षांपूर्वी सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली चिन्मयी प्रभुदेसाई ही मुलगी पुढे बोस्टन सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठात कर्करोगावर संशोधन करते

Sameer Amunekar

गोव्यातील तरवळे-शिरोड्यासारख्या साधारण खेडेगावात पंचवीस तीस वर्षांपूर्वी सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली चिन्मयी प्रभुदेसाई ही मुलगी पुढे बोस्टन सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठात कर्करोगावर संशोधन करते, हे स्वप्न नाही तर सत्य आहे. या यशामागे आहे तिच्या पालकांनी, शिक्षकांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास, तिची, मेहनत, चिकाटी, आणि अर्थात हुशारीही.

लहानपणापासून अभ्यासात नेहमीच पहिली येणारी चिन्मयी ‘एनआयटी’ गोवा मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधील पदवी घेऊन थांबली नाही. २०१५ साली या शिक्षणात तिने धीरूभाई अंबानी शिष्यवृत्ती आणि राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्राप्त केले.

याच काळात तिने भौतिकशास्त्रातील ३००हून अधिक प्रकल्पांमध्ये स्पर्धा करत भोपाळमधील राष्ट्रीय ‘आयफास्ट सविष्कार’ विज्ञान प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कारही जिंकला. त्यानंतर तिने बफेलो विद्यापीठात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतली, जिथे तिने ‘न्यूरोफोटोनिक्स’वर संशोधन केले. या अनुभवांमुळे पुढचा डॉक्टरेट करण्याचा म्हणजेच संशोधनाचा मार्ग सुकर झाला.

संशोधनासाठी महिलांच्या आरोग्याचा विषय तिने निवडला. नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही. रमन यांनी शोधलेल्या रमन स्कॅटरिंगच्या प्रगत स्वरूपाचा वापर करून, चिन्मयीने कर्करोग हा महत्वाचा विषय अभ्यासला. जगभरातील महिलांमधे दोन प्रकारचे कर्करोग मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. स्तनाचा आणि गर्भाशयाचा. या दोन प्रकारच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या महिलांना आणि त्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या संशोधनाची भविष्यात मदत होऊ शकेल.

कोणत्याही रोगाचे निदान जेवढे कमी वेळात होईल तेवढा उपचार त्वरित आणि परिणामकारक होतो हे साधारण तत्व लक्षात घेऊन तिने यावर संशोधन करायचे ठरवले. स्तंनाच्या कर्करोग निदानासाठी तिने ‘डिजिटल बायोप्सी’चा आधार घेतला. या प्रकारच्या रोगाच्या चाचणीतून केवळ एका तासात निदान होऊ शकते, असेही ती सांगते.

या साठी ग्रीसमधील आंतरराष्ट्रीय SPEC २०२४ परिषदेत सर्वोत्तम सादरीकरण आणि शिष्यवृत्तीसाठी पुरस्कार मिळाला एवढेच नाही, तर त्यांच्या प्रयोगशाळेतील साथीदार होंगलीनी यांच्याकडून अमेरिकेत पेटंटही मिळाले. अशा प्रकाराने कर्करोगाची चाचणी एका कंपनीच्या सहकार्याने रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी वापरली गेली आहे. प्रगत बायोमेडिकल अभियांत्रिकीमधील या शोधांचा फायदा हा जगभरातील महिला रुग्णांना व्हावा यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत.

गर्भाशयाच्या कर्करोगासाठी, चिन्मयीने प्रयत्नपूर्वक वेगळे संशोधन प्रकल्प सुरू केले. यात तिने CAR-T सेल थेरपी, इम्युनोथेरपीचा, कर्करोगाच्या पेशींना औषधांसह जोडून अधिक प्रभावी कसा बनवता येईल याचा अभ्यास केला. या दुसऱ्या प्रकल्पात, तिने केमोथेरपी प्रतिरोधकतेचे ‘बायोमार्कर’ ओळखण्यासाठी ‘इमेजिंग’चा वापर केला, जेव्हा कर्करोग नेहमीच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देऊ शकत नाही.

कारण यामुळे डॉक्टरांना कोणत्या रुग्णांना परत भविष्यात हाच त्रास होईल ते ओळखण्यास आणि त्यांच्या उपचार योजना लवकर करण्यास मदत होऊ शकते. यामुळे हा शोध विशेषतः महत्त्वाचा आहे. ती सध्या एका डॉक्टर-शास्त्रज्ञासोबत सहयोग करत आहे. यात थेट उपचार-प्रतिरोधक ट्यूमर शोधण्यासाठी तिची पद्धत अनुकूल ठरू शकेल.

याचा अर्थ रुग्णांना आठवड्यांऐवजी तासांत निदान होऊ शकते आणि मग पुढच्या उपचारासाठी मदत होते. या संशोधनाचा उपयोग लवकरात लवकर आणि भारतात, गोव्यातही व्हावा आणि कर्करोगग्रस्त महिलांना त्याचा फायदा मिळावा, यासाठी चिन्मयी प्रयत्नरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Airstrike: पाक लष्कराकडून स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; महिला व मुलांसह 30 ठार Watch Video

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

गोव्यातील तरुणीवर उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार? तरुणीने व्हिडिओतून केले गंभीर आरोप

AI Image trends: 'फोटो ट्रेंड्स'च्या मायाजाळात हरवू नका; वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करा!

SCROLL FOR NEXT