Success in rescuing 4 tourists in South Goa Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात 4 पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्यात यश

पाण्यात कयाकमधून सफर करत असताना कयाक उलटल्यानंतर बचावकार्य करून त्यांना सुखरूप वाचवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

गोव्याचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी देश-परदेशातील पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. यावेळी ते अनेक जलक्रीडा प्रकरांमध्ये भाग घेतात. दरम्यान पर्यटकांसोबत खूपदा दुर्घटनादेखील घडतात. अशाच काही दुर्घटना दक्षिण गोव्यात (South Goa) घडली आहे. पाण्यात कयाकमधून सफर करत असताना काही पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे.

दक्षिण गोव्यात आठवड्याच्या शेवटी काणकोणमधील चारजण पाण्यात बुडाले होते. यावेळी बचावकार्य करून त्यांना सुखरूप वाचवण्यात आले. पाळोळे येथे दोन पर्यटकांना वाचवले असून दोघेही बेंगळुरूचे आहेत. त्यांची कयाक उलटल्यानंतर ते पाण्यात बुडाले होते. यावेळी जीवरक्षक सर्वेश गोवेकर यांनी त्यांच्या जेट स्कीसह धाव घेतली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणले.

जीवरक्षकांद्वारे आणखी दोन बचावकार्य हाती घेण्यात आले ज्यात दिल्लीतील एका 33 वर्षीय महिला पर्यटकाची अगोंदा येथे सुटका करण्यात आली, तर 27 वर्षीय पुरुष पर्यटकाची बायणा येथे सुटका करण्यात आली. याशिवाय कळंगुट समुद्रकिनारी एक 8 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, बराच शोध घेतल्यानंतर ती सापडली आणि पोलिसांच्या उपस्थितीत तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. अशाप्रकारे एकूण 4 बचावकार्ये करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT