Goa Fire
Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: पूर्वेकडील वणव्यांवर नियंत्रण आणण्यात यश

गोमन्तक डिजिटल टीम

राज्याच्या पूर्वेकडील अभयारण्यात लागलेल्या वणव्यांवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. त्याचबरोबर आगी लागलेल्या ठिकाणी लक्ष ठेवले जात असल्याची माहिती वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. मंगळवारी राणे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), राष्ट्रीय आपत्ती

कृती दल (एनडीआरएफ), गृह मंत्रालय आणि पर्यावरण खाते, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक वन अग्नी व्यवस्थापन आराखडा तयार केला जाणार आहे.

म्हादई अभयारण्यात 5 मार्चला आग लागल्यानंतर ७१ ठिकाणी थांबून ती विझविण्यात आली आहे. म्हादई वन्यजीव अभयारण्यातील साट्रे या गावात जंगलात वणवा लागल्याचे दिसून आले. त्यानंतर अभयारण्यात ती आग विस्तारली. या आगीचा प्रसार मोले, नेत्रावळी अभयारण्यापर्यंत झाला’, असे राणे यांनी सांगितले.

कुडचडे वन्यक्षेत्रात आग

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला 16 कॉल्स आले. त्यापैकी 12 कॉल्स आगीच्या संदर्भातील होते. तर 2 कॉल्स आपत्कालिन व अपघाताबाबत होते. सत्तरी तसेच धारबांदोडा तालुक्यातून जंगलातील आगीसंदर्भात एकही कॉल नसला तरी कुडचडे येथे वन्यक्षेत्रात आग लागल्याचा एक कॉल नोंद झाला आहे. आगीच्या घटनेमध्ये ६ कॉल्स गवताला आग लागल्याचे आहेत.

सह्याद्रीच्या पश्‍चिम घाटातील वणव्यामुळे जंगलाचा मोठा भाग आगीमुळे नष्ट झाला आहे. जंगलात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काजू बागायती केल्या आहेत. जमिनीवर राख पडावी म्हणून काही ठिकाणी बागायतीलील गवत जाळले जाते. सोमवारी आठ ठिकाणी वणवा सक्रिय दिसला. दरम्यान, सरकारने या आगीचे कारण शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. - विश्‍वजीत राणे, वनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT