Anjuna Substations  Dainik Gomantak
गोवा

ऐन दिवाळीत वीजेचा खेळखंडोबा! लक्ष्मीपूजनादिवशी केबल्समध्ये बिघाड; नागरिकांची गैरसोय

Anjuna Substations: हणजूण येथील उपकेंद्राला जोडणारे ३३ केव्ही मुख्य वीज केबल शुक्रवारी पहाटे ३ वाजता नादुरुस्त झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत आणि लक्ष्मीपूजनादिनीच हणजूण-कायसूव तसेच आसगाव पंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

Power Outage Hits Anjuna and Assagao Due to Damaged Main Cable

म्हापसा: हणजूण येथील उपकेंद्राला जोडणारे ३३ केव्ही मुख्य वीज केबल शुक्रवारी (ता.१) पहाटे ३ वाजता नादुरुस्त झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत आणि लक्ष्मीपूजनादिनीच हणजूण-कायसूव तसेच आसगाव पंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला.

दरम्यान, वीज खात्याने पर्यायी व्यवस्था केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अचानक हणजूण वीज केंद्राचा पुरवठा खंडित झाला. या केंद्राला म्हापसा वीज केंद्राद्वारे जोडणी दिलेल्या भूमिगत वीज केबल्समध्ये बिघाड झाला व ही जोडणी खंडित झाली.

वीज केंद्राचा पुरवठा खंडित झाल्यामुळे या केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हणजूण, कायसूव, वागातोर, शापोरा, आसगाव व बादे या गावांमध्ये अंधार पसरला. भर दिवाळीच्या सणावेळी तेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वीज गायब झाल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. विजेअभावी लोकांची पहाटे झोपमोड झाली.

भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार समोर येताच पहाटेच वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा बिघाड शोधण्याचे काम हाती घेतले. मात्र, बिघाड सापडू शकला नाही. सकाळी फोंडा येथून केबल फायंडिंग मशीन आणल्यानंतर म्हापसा ते हणजूणपर्यंतच्या पट्ट्यात केबलमधील बिघाड शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारी ३ वा. हा बिघाड सापडला. हणजूण वीज उपकेंद्राच्या जवळच काही अंतरावर केबल नादुरुस्त झाल्या होत्या.

गुरुवारी रात्री विजेच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे हा बिघाड झाला असावा, अशी शक्यता वीज अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. केबल बिघाडाचे नेमके ठिकाण सापडल्यावर लगेच वीज कर्मचाऱ्यांनी हे केबल दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पर्यटनाला बसला फटका

सकाळी जुन्या फिडरच्या माध्यमातून वीज खात्याने विजेची पर्यायी व्यवस्था केली. हणजूण व आसगावमधील फक्त घरगुती वीजग्राहकांना वीजपुरवठा देण्यात आला. मात्र, वीजपुरवठा नसल्याने व्यावसायिक आस्थापनांची विशेषतः हॉटेल, रेस्टॉरन्टवाल्यांची धांदल उडाली. हणजूण व आसगाव पंचायत क्षेत्र हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे खंडित वीजपुरवठ्याचा फटका पर्यटनालादेखील झाला.

बिघाड सापडला, दुरुस्ती सुरू

हणजूण उपवीज केंद्राला जोडणाऱ्या भूमिगत वीज केबलमध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड दुपारी शोधून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT