High Court Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival : सनबर्न ध्वनी प्रदूषणाचा अहवाल चार आठवड्यात सादर करा - उच्च न्यायालय

सनबर्न विरोधात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तक्रार नोंद केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

गतवर्षीच्‍या शेवटी 28 ते 30 डिसेंबरदरम्यान वागातोर येथे झालेल्या ‘सनबर्न इडीएम’ पार्टीत ध्वनिप्रदूषण करत आवाजाची मर्यादा ओलांडल्‍याबद्दल गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजकांविरोधात तक्रार नोंद केली होती. स्थानिकांनीही उच्च न्यायालयात धाव घेत संबंधितांवर खटला दाखल केला आहे. या पार्टीत ध्वनिप्रदूषणासाठीचे 55 डेसिबल- ए आवाजाचे उल्लंघन केले होते.

यासंबंधीचा तपशील सादर करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती, ती न्यायालयाने मंजूर केली आहे. पुढील सुनावणीवेळी हा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्टीत ही ध्वनिप्रदूषणाची पातळी काही वेळा 65 डिसेबलपेक्षा जास्त होती, तर काही ठिकाणी हीच मर्यादा 90 डिसेबल- ए श्रेणीत होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.

30 डिसेंबर रोजी सनबर्न महोत्सवात ध्वनी प्रदूषण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हणजूण पोलिस निरीक्षक व म्हापसा उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनी आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी.

ध्वनी प्रदूषणाच्या पुराव्यांच्या आधारे सनबर्न आयोजकांविरुद्ध जानेवारी अखेरपर्यंत गुन्हा दाखल करणार, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT