Government Scheme: बाबल्याखळी, नागझर-कुर्टी येथे घडलेल्या ‘लाडली लक्ष्मी’ योजनेच्या दोन लाभार्थी युवतींना तसेच इतरांना मारहाण करण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी छडा लावून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील काँग्रेस महिला विभाग अध्यक्ष शर्ली डायस यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजप सरकारच्या काळात सरकारी योजनांसाठी दलाली करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी ठरलेला सौदा फिसकटल्याने भाजप कार्यकर्ती महिला सुवर्णा कंपाड हिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना मदतीला घेऊन मुबिना इरफान पिरजादे व तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
त्यात मुबिना यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे सध्या त्या मडगावच्या इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला असून स्कॅनिंग करण्यात येत असल्याचे मुबिनाच्या नातेवाईकांनी सांगितल्याचे शर्ली डायस यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची योग्य दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
संशयित सुवर्णा कंपाड हिने यापूर्वीही अनेकांना अशा प्रकारे सरकारी योजनांचा लाभ मिळवून देताना मोठ्या प्रमाणात दलाली उकळली आहे. तरीही भाजपचे नेते अशा लोकांना अभय देत आहेत, असाही आरोप डायस यांनी केला.
दरम्यान, फोंडा काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला फोंडा गट काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक विलियम्स आगियार, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष रफिक मुजावर व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.