Canacona Gomantak Digital Team
गोवा

Canacona News : 'त्या' पोर्तुगीजकालीन इमारती मोजताहेत अखेरच्या घटका..

चावडी येथील ग्रामस्थांचे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण : काणकोण पालिका क्षेत्रातील चावडी येथील जुन्या इमारती कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासंदर्भात चावडी येथील शंकर विनायक नाईक व रामकृष्ण विनायक नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन इमारती धोकादायक असल्याने त्या पाडण्याची विनंती केली होती.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काणकोण उपजिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या इमारतीची पहाणी करून आपला अहवाल दिला. त्यानुसार पालिकेने या जुन्या इमारतीची पहाणी करून इमारतीच्या मजबुती संदर्भातील अहवाल देण्यासबंधी पत्र 5 मे रोजी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पाठविले आहे.

त्या यादीत परशुराम रघुनाथ प्रभू बिल्डिंग, दामोदर नारायण प्रभू बिल्डिंग, नागेश दामोदर प्रभू बिल्डिंग, म्युनिसिपल रेसिडेंशियल कम कमर्शियल बिल्डिंग व शंकर नाईक यांच्या इमारतीचा समावेश आहे.

या इमारतीपैकी काही इमारती पोर्तुगीजकालीन असून काही इमारतींचे काही भाग कोसळले आहेत. काही इमारतींना टेकू लावण्यात आले आहेत. यापैकी काही इमारती मडगाव - कारवार हमरस्त्याच्या कडेला असल्याने त्या कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT