Subhash Velingkar Marathi official language warning Dainik Gomantak
गोवा

Marathi official language: मराठीला 'राजभाषा दर्जा' न दिल्यास धडा शिकवू, मडगावातील लोहिया मैदानावर सुभाष वेलिंगकरांचा एल्गार

Subhash Velingkar Marathi official language warning: मराठीला राजभाषेचा दर्जा न दिल्यास राज्य सरकारला कायमची अद्दल घडवू, असा गर्भित इशारा प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मराठीला राजभाषेचा दर्जा न दिल्यास राज्य सरकारला कायमची अद्दल घडवू, असा गर्भित इशारा मडगावच्या लोहिया मैदानावर मराठी राजभाषा निर्धार समितीच्या जाहीर सभेत या समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला. सभेत मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देणारच, असा निर्धारही करण्यात आला.

मराठी राजभाषेसाठीचा हा लढा आता तीव्र केला जाईल. व्होट बँक तयार केली जाईल. वेळोवेळी मराठीची अवहेलना करण्यात आली आहे. यापुढे आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाहीत, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.

गो. रा. ढवळीकर, विनायक च्यारी, मच्छिंद्र च्यारी, रोशन सामंत यांनीही विचार मांडले. पौर्णिमा देसाई यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन विनय नाईक यांनी केले.

मागणी पूर्ण करणाऱ्या पक्षाला बहुमत

डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. त्यापूर्वी कदाचित एका दिवसाचे विधानसभा अधिवेशनही होऊ शकते. त्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली. जर आमची मागणी पूर्ण झाली तर आगामी विधानसभा निवडणुकीत याच पक्षाला आम्ही बहुमताने निवडूनही आणू, असेही वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT