Subhash Velingkar Case Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar Case: वेलिंगकर पुन्हा पोलीस ठाण्यात, शुक्रवारी तीन तास कसून चौकशी

St. Xavier Controversy Goa: आज दुसऱ्यांदा वेलिंगकरांची डिचोली ठाण्यात चौकशी, चौकशीनंतर वेलिंगकरांनी माध्यमांशी संवाद साधला

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Velingkar Bicholim Police Case Update

डिचोली : सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवमान केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या सुभाष वेलिंगकरांची शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. तब्बल तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली असून चौकशीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली. मी पोलिसांना चौकशीत सहकार्य करत असल्याचे सांगत वेलिंगकर पोलीस ठाण्याबाहेर निघाले.

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट झेवियर यांच्या अवशेषांची DNA चाचणी व्हावी, अशी मागणी केल्याने गोव्यात वाद निर्माण झाला. राज्यातील ख्रिस्ती समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी राज्यभरात मोर्चे काढले. तर दुसरीकडे वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववाद्यांनीही मोर्चे काढले. भावना दुखावल्याप्रकरणी वेलिंगकर यांच्याविरोधात डिचोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असतानाच वेलिंगकर यांच्यावतीने मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशानुसार शेवटी वेलिंगकर हे गुरुवारी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. अवघ्या २० मिनिटांत पहिल्या दिवसाची चौकशी पूर्ण झाली.

शुक्रवारी (११ ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी वेलिंगकर चौकशीसाठी डिचोली पोलीस ठाण्यात पोहोचले. चौकशीनंतर पोलीस ठाण्याबाहेर माध्यमांना वेलिंगकर यांनी सांगितले की, "मी आदेशाचे पालन करत पोलिसांना सर्व आवश्यक ती माहिती दिली आहे. एवढंच नाहीतर मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन अशी ग्वाही देखील दिली आहे".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT