Subhash Velingkar And Relics of St. Francis Xavier Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier: शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

St. Francis Xavier News: सेंट फ्रान्सिस झेवियर शवाची 'डीएनए' टेस्ट करावी मुद्दा; सुभाष वेलिंगकर यांची उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांसह जुने गोवे पोलिसांत तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर शवाची 'डीएनए' टेस्ट करावी, अशी मागणी केल्याबद्दल बुधवारी (०२ ऑक्टोबर) जुने गोवे पोलिस ठाण्यात सांकवाळ आंदोलनात गुंतलेल्या एका विशिष्ट गटाने तक्रार केली. त्यानंतर आज, गुरुवारी (०३ ऑक्टोबर) हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांसह जुने गोवे पोलिसांत तक्रार दिली आहे.

घटनेच्या चौकटीत मी मागणी केलेली असताना बुधवारी 'त्या' विशिष्ट गटाने आपली व्यक्तिगत बदनामी व चारित्र्यहनन केले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात वेलिंगकर म्हणतात- डीएनए टेस्टची मागणी तर जुनीच आहे; शिवाय 'सेंट' म्हणून चर्चची मान्यता मिळालेल्या व्यक्तींच्या अवशेषांची अशी चाचणी करून देण्याची चर्चची परंपरा आहे.

४०० वर्षांपूर्वी जिवे मारली गेलेली जॉर्जियाची राणी केटेवन हिच्या अवशेषांचा शोध जुने गोवे येथेच ऑगस्टीन टॉवर भूमीत सरकार व चर्चच्या रीतसर परवानगीने उत्खनन करून घेतला गेला. चर्चच्या संमतीने त्या राणीच्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून ते अवशेष राणीचेच होते हे सिद्ध झाल्यावर १० जुलै २०२१ रोजी भारत सरकारने सन्मानपूर्वक ते जॉर्जिया सरकारच्या स्वाधीन केले.

या राणीला 'सेंट' पद देण्यात आले होते. एका 'सेंट'ला एक न्याय आणि दुसऱ्या 'सेंट'च्या बाबतीत मात्र 'जातीय सलोखा' कसा व का बिघडतो ? संशयाचा सोक्षमोक्ष लावावा, असे चर्चला वाटू नये का? अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने एकदा हे शव झेवियरचे आहे हे सिद्ध व्हायला का नको ? एवढे खवळण्याचे कारण काय ? भविष्यात पुन्हा असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मागणी करणे गैर ठरत नाही, असेही अखेरीस वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

नाराजी व्यक्त

प्रा. वेलिंकर यांच्या वक्तव्यानंतर अनेक भागांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही राजकीय नेत्यांनी उघड विरोधी भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT