St. Xaviers Exposition Goa Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier: का करायचीय झेवियर यांच्या अवशेषांची DNA चाचणी? सुभाष वेलिंगकरांनी सांगितले कारण

गोमन्तक डिजिटल टीम

St. Xavier's Exposition in Old Goa

ओल्ड गोव्यात प्रसिद्ध असलेल्या सेंट झेवियर्सच्या अवशेषांची DNA चाचणी करावी अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीच्या सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. येत्या नोव्हेंबर महिन्यात २१ तारखेपासून ते ४ जानेवारी पर्यंत सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्या अवशेषांचे प्रदर्शन होणार आहे.

हे प्रदर्शन होण्याआधी झेवियर्स यांच्या अवशेषांची चाचणी व्हावी अशी मागणी वेलिंगकरांनी केलीये. वेलिंगकरांच्या मागणीमुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं असतानाच सुभाष वेलिंगकर यांनी आणखीन एक प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाले वेलिंगकर?

सुभाष वेलिंगकर यांच्या मते इतिहासाबद्दल कोणाच्याही मनात प्रश्नचिन्ह उभं राहू नये म्हणून टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात काही गैर नाही. या संदर्भात दाखला देताना ते सांगतात की ओल्ड गोव्यात जॉर्जियाच्या राणीचे काही अवशेष मिळाले होते. हे अवशेष भारत सरकारकडून जॉर्जियाच्या सरकारला समर्पित करण्यात आले. पुढे जॉर्जिया चर्चच्या संमतीवरून दोन्ही सरकारांनी एकत्र येत या अवशेषांची DNA चाचणी केली, ही चाचणी यशस्वी झाली आणि आज जॉर्जियाच्या राणीला संत म्हणून ओळखलं जातंय.

गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्या अवशेषांवरून अनेकवेळा वाद निर्माण झालेत आणि या वादांना कायमचा पूर्णविराम लागावा म्हणून मी DNA चाचणीची मागणी करतोय असं सुभाष वेलिंगकर यांचं म्हणणं आहे. भारतीय संविधानाच्या अनुसार ऐतिहासिक पुरावे शोधण्याला मान्यता मिळाली आहे त्यामुळे वेलिंकाराच्या मते त्यांना कुठल्याही समुदायाच्या भावना दुखवायच्या नसून केवळ सत्य सर्वांसमोर आणून या वादाला पूर्णविराम लावायचा आहे अशी माहिती त्यांनी व्हिडियोच्या मध्यातून गोव्यातील एका वहिनीला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 4 October 2024: 'या' राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ!! जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Bhumika Temple: नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भूमिका मंदिराला टाळा कोणी लावला; दोन गट आमने - सामने, हस्तक्षेप न करण्याची सूचना

उत्तर गोव्यातील घरफोड्यांच्या पर्दाफाश, अट्टल चोरासह फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याला अटक; राज्यातील ठळक बातम्या

शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

Ashwem News: अखेर वाद आटोक्यात!! दोन्ही गटांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक

SCROLL FOR NEXT