Rain News | Subhash Shiradkar  Dainik Gomantak
गोवा

'पूरस्थिती टाळण्यासाठी बंधारे उभारून नद्यांचे पाणी अडवणार'

पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शापोरा नदीत साळ येथे आणि कळणे नदीवर बैलपार येथे बंधारे उभारून पाणी अडवणार असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात यंदाच्या पावसात ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शापोरा नदीत साळ येथे आणि कळणे नदीवर बैलपार येथे बंधारे उभारून पाणी अडवणार असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.

यावर्षी झालेल्या पावसात उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातही गोवेकरांची दाणादाण उडाली होती. अनेक घरांवर झाडं, दरड कोसळल्याने घरांची पडझड झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक बेघर झाले होते. यावर तातडीने पावलं उचलत पूरग्रस्तांसाठी बाराही तालुक्यांत निवारा केंद्रे उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्यातील 9 निवारा केंद्रे तयार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान पुढील सहा महिन्यात गोव्यातील खाणींचे लिलाव होऊन खाणी सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केली आहे. त्यामुळे सरकारकडून लवकरच याबाबतची पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. असं असलं तरीही वेदांता सारख्या कंपन्यांनी कामगारांना कामावरुन कमी केल्याने खाण अवलंबितांमध्ये कमालीची नाराजी आहे. खाणी सुरु झाल्यास त्याचा फायदा खाणपट्ट्यातील एका मोठ्या वर्गाला होणार आहे, जो केवळ खाणींवर अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT