subhash faldesai
subhash faldesai Dainik Gomantak
गोवा

आयआयटी’ विरोधातील कटकारस्‍थान उधळून लावणार : सुभाष फळदेसाई

दैनिक गोमन्तक

पणजी: काही राजकारणी आणि काही एनजीओ जनतेला आयआयटी प्रकल्पाविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगेवासीयांना हे कटकारस्थान माहीत असून आम्ही ते उधळून लावणार आहोत, असे मत सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.

(Subhash Phaldesai's statement will foil the conspiracy against IIT)

सांगे येथे आयआयटी प्रकल्पाविरोधात महिला शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात मंत्री फळदेसाई यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. यावर ते म्हणाले, कोणत्याही प्रकारची शेती नसलेल्या 7.5 लाख चौरस मीटर सरकारी जमिनीत हा प्रकल्प येत आहे. तसेच, शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल. यापूर्वी जेव्हा प्रकल्पासाठी 13 लाख चौरस मीटर जमीन निश्‍चित करण्यात आली होती, तेव्हा काही खासगी जमीन आणि शेतजमिनी प्रकल्पाच्या कक्षेत येत होत्या. परंतु प्रकल्पासाठी जमीन कमी करून बिगरशेती सरकारी जमिनीपुरती मर्यादित केली आहे.

लपून-छपून काही करणार नाही

आयआयटी प्रकल्प सांगेमध्ये आणणार, हा मुद्दा घेऊनच आपण विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे मी लपून काही करणार असे मुळीच नाही. आज लोकांना या प्रकल्पाचे महत्त्व समजले आहे. हा शैक्षणिक प्रकल्प असून, त्यामुळे प्रदूषण होणार नाही. उलट प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याची गरज पडल्यास सुमारे चार हजार लोक तयार आहेत, असा दावाही फळदेसाई यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT