Subhash Phaldesai resigned as deputy speaker of goa assembly Dainik Gomantak
गोवा

सुभाष फळदेसाईंचा उपसभापतीपदाचा राजीनामा

गोव्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने विधानसभा उपसभापतीपदाचा राजीनामा देणं बंधनकारक

दैनिक गोमन्तक

पणजी : सांगेचे भाजपचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेच्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. फळदेसाई यांची गोवा मंत्रिमंडळाच्या विस्तारात वर्णी लागल्याने त्यांना आपलं पद सोडावं लागलं होतं. नुकतीच त्यांची उपसभापतीपदी निवड झाली होती.

गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी सांगेचे भाजप आमदार सुभाष फळदेसाई यांची निवड झाली होती. फळदेसाई यांना 24 तर काँग्रेसचे आमदार केदार नाईक यांना 15 जणांनी पाठिंबा दिला. सभापतीपदासाठी रमेश तवडकर यांची निवड झाल्यानंतर उपसभापती पदासाठी भाजपतर्फे आमदार सुभाष फळदेसाई आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी तर काँग्रेसतर्फे आमदार केदार नाईक यांनी अर्ज दाखल केले होते.

प्रमोद सावंत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज म्हणजेच शनिवारी निश्‍चित झाला असून त्यात मगोपच्या सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांच्यासह सांगेचे भाजपचे आमदार सुभाष फळदेसाई आणि थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रिपद निश्‍चित झाले आहे. सुभाष फळदेसाई हे विधानसभेचे उपसभापती असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच खातेवाटप करण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यानुसार उद्या (रविवारी) खातेवाटप होईल. यापूर्वी रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळात घेतल्याने हळर्णकर हे बार्देशचे दुसरे भाजप (BJP) नेते आहेत. सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेतल्याने फोंडा तालुक्यात चार मंत्री होणार असले, तरी मगोपच्या प्रस्तावानुसार ढवळीकर यांना मंत्रिपद देण्यात येत आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता राजभवन परिसरात नव्याने उभारलेल्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई या तीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT