Students writing exam Dainik Gomantak
गोवा

विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे : सुभाष फळदेसाई

कुडचडे सरकारी तंत्रनिकेतन विद्यालयाचा रौप्यमहोत्सवी सोहळा उत्साहात

दैनिक गोमन्तक

केपे : विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेला न घाबरता सामोरे गेले पाहिजे. पास व नापास होण्याची भीती मनात न बाळगता येणाऱ्या अडचणींवर मात केल्यास त्याला यशाच्या शिखरावर पोहचण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही, असे उदगार समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काढले. ते कुडचडे येथील सरकारी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Students should face the exam without fear says Subhash Faldessai)

यावेळी व्यासपीठावर मायकल डिसोझा, डॉ. विवेक कामत व अजित गावकर उपस्थित होते. आपल्या आयुष्यात अनेक आव्हाने उभी असतील, त्यांना तोंड देऊन पुढे गेल्यास आपले भवितव्य उज्वल होऊ शकते, असे फळदेसाई यांनी सांगितले. नापास होण्याच्या भीतीने किंवा नापास झालो म्हणून अनेक विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडतात हे पूर्णपणे चुकीचे आहे. जीवन जगणे ही एक कला असून तणाव न घेता अभ्यास केल्यास बरेच अडथळे आपण सहज दूर करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

कुडचडे येथील ही सरकारी तंत्रनिकेतन शाळा छोट्या स्वरूपात सुरू केली होती व आज या शाळेची भव्य वास्तू उभी असून अनेक हुशार विद्यार्थी या शाळेने राज्याला दिले आहेत व ते आता चांगल्या पदावर आहेत, असे मायकल डिसोझा यांनी सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

SCROLL FOR NEXT