Rakhi Purnima Fest
Rakhi Purnima Fest  Dainik Gomantak
गोवा

पेडण्यात अग्निशमन दल,पोलिस बांधवांसोबत विद्यार्थ्यांनी साजरे केले रक्षाबंधन

दैनिक गोमन्तक

बहिणीचा भावावरचे प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. या दिवशी बहिण भावाला राखी बांधत हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. या पार्श्वभूमीवर आज पेडण्यात आगळी - वेगळी राखी पौर्णिमा सण साजरा करण्यात आली.

(Students of Pernem celebrated Rakhi Purnima with security forces and policemen)

मिळालेल्या माहितीनुसार पेडणे येथील श्री भगवती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान व पेडणे पोलीस स्टेशनमध्ये पोलिस बांधवांना विद्यार्थ्यांनी राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी जवान, अधिकारी तसेच पोलिस बांधवांना राखी बांधली व आपण आमचे संरक्षण करता याबद्दल आम्ही कायम आपल्या ऋणात राहू असे विद्यार्थ्यांनी आपल्या भावणा व्यक्त केल्या आहेत.

Goa Shravan Culture : गोव्यातला श्रावण.. निसर्ग समृद्धतेने आणि परंपरेने नटलेला!

चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. या महिन्यात निसर्ग नव्याने फुलून आलेला असतो. नुकताच पाऊस सुरू झाल्याने निसर्गात अनेक नवे बदल झालेले असतात. या पर्यावरणीय बाजूसोबतच आध्यात्मिक बाजूनेही श्रावण इतर महिन्यांपेक्षा उजवा आहे. व्रत-वैकल्ये, पूजापाठ, देव-देवतांची उपासना करण्यासाठी श्रावणाचे खूप महत्व आहे.

गोव्यातील श्रावणात होणारे पत्रीपूजन

पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेल्या आपल्या गोव्याला निसर्गाचे अद्भुत वरदान लाभले आहे. इथल्या जंगलांमध्ये अनेक विविध प्रकारच्या नैसर्गिक, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि झाडे आढळून येतात. हे औषधी गुणधर्म माणसाला उपयोगी यावेत म्हणून त्यांचा समावेश आपल्या पारंपरिक देवकार्यांमध्ये करण्यात आला.

गोव्याच्या भूमीला वृक्षवनस्पतींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभलेला आहे. त्यामुळे मौसमानुसार निसर्गात मिळणाऱ्या या वनस्पती आणि पान-फुलांचे आपल्या सणांमध्ये, धार्मिक-सांस्कृतिक कार्यांमध्ये विशेष स्थान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT