CM PRamod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Sports: गोव्यातील शाळांमध्ये 75 देशी खेळ शिकवणार! Fit For Life परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

Cm Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्यात क्रीडा संस्कृतीची समृद्ध वारसा आहे. योग्य प्रशिक्षण, खेळाडूंना साधनसुविधांच्या माध्यमातून आम्ही उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Sameer Panditrao

Fit for Life International Conference at Goa University

पणजी: भारतीय खेलच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना ७५ पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकार शिकविण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. आपल्या युवा पिढीला आपल्या भारतीय सांस्कृतिक वारसा कळावा तसेच सुदृढ शरीर व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व इतर संस्थांच्या सहकार्याने आयोजित फिट फॉर लाइफ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटनसमयी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उषा नायर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, वेटलिफ्टर कुंजराणी देवी, प्रा. सुंदर धुरी व इतर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, गोव्यात क्रीडा संस्कृतीची समृद्ध वारसा आहे. योग्य प्रशिक्षण, खेळाडूंना सहाय्य आणि साधनसुविधांच्या माध्यमातून आम्ही उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ज्याप्रमाणे आम्ही आधुनिक क्रीडा प्रकारांच्या खेळाच्या स्पर्धा आयोजित करतो, त्याचप्रमाणे आपले पारंपरिक क्रीडा प्रकार खो-खो, कबडी, मलखांब आदीचे संवर्धन करणे त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा विकासासाठी सरकार कटिबद्ध

सरकार क्रीडा आणि युवांच्या विकासासाठी कटिबद्ध असून उत्तम प्रकारच्या साधनसुविधा, स्टेडीयम, प्रशिक्षण केंद्रे तसेच शिष्यवृत्ती देत आहे.

पारंपरिक खेळांच्या संवर्धन आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन केले जात आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण आणि खेळालाही प्राधान्य दिले जात आहे.

फीट इंडिया मोहिमेनंतर सर्व वयोगटातील नागरिक व्यायाम आणि खेळाला प्राधान्य देत आहेत.

आपल्या सशक्त, क्रीडा क्षेत्रात नवनवीन उंची गाठणारा नवा भारत निर्माण करायचा आहे त्यासाठी खेळाडू, प्रशिक्षण, संशोधक आणि नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.

खेळामुळे राष्ट्रीयतेला चालना

सुदृढ शरीरासाठी खेळ, व्यायाम हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. खेळामुळे केवळ शरीर निरोगी होत नाही तर त्यामुळे चारित्र, संघटित कार्य करण्याची क्षमता, शिस्त आणि नेतृत्वगुण देखील वाढतात. खेळ सर्वांना एकत्रित आणतो, क्रीडापटूंना जागतिक स्तरावर ओळख मिळते. त्यासोबतच, खेळामुळे राष्ट्रीयतेला चालना मिळते. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करणे किंवा खेळणे हा दररोजच्या जीवनाचा घटक बनविणे गरजेचे आहे. पोषक संतुलित आहार घ्या, जे खेळू इच्छितात त्यांना प्रोत्साहन द्या, योग्य मार्गदर्शन करा, खिलाडूवृत्ती साजरी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हडफडे दुर्घटनेतील आरोपी लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात! लवकरच भारतात आणण्याची शक्यता

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

Smriti Mandhana: 'जास्त प्रेम करणारे...', स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली Watch Video

SCROLL FOR NEXT