भारतीय वायू सेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘टच द स्काय विथ ग्लोरी’ एअरक्राफ्ट माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खास नवी दिल्लीहून भारतीय वायू सेनेचे अधिकारी खास बस घेऊन गोव्यात आले आहेत.
आज फातोर्डा येथील डॉन बॉस्को महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन खुले होते. उद्या झुआरीनगर येथील बिट्स पिलानी विद्यार्थ्यांसाठी व सोमवारी गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन दाखवले जाईल. मंगळवारी हे अधिकारी बससह नवी दिल्लीत परतणार आहेत.
या बसमध्ये एअरक्राफ्टमधील वैमानिकाचा पेहराव, त्याला दिलेल्या सूचना, अपघाताच्या वेळी काय करावे, एअरक्राफ्ट चालवताना त्यांच्याकडे काय काय सुपुर्द केले जाते. त्यांना दिलेला पेहराव गाढ हिरव्या रंगाचा असतो. तो याच रंगाचाच का असतो, ही सर्व माहिती देण्यात आली.
अपघाताच्या वेळी किंवा अनोखळी प्रदेशात पोहोचल्यात हिरव्यागार झाडां झुडुपांमध्ये लपण्यास सोपे व्हावे. किंवा चिखल अंगाला लागला तर त्या चिखलाचा रंग त्याला चिकटतो, असे या वेळी सांगण्यात आले.
एअर कंट्रोल रुममधून कशा मिळतात सूचना?
वैमानिकाला आपण किती उंचीवर आहे, कुठल्या दिशेने आहे, याची माहिती कशी मिळते व त्याला एअर कंट्रोल रुममधून कशा प्रकारे सूचना मिळतात, याची माहिती यावेळी देण्यात आली.
फ्लाईट कमांडर दया शंकर अग्रवाल, फ्लाईट कमांटर अंकित भट, फ्लाईट कमांडर अरुण यादव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.