माझे नदी गे बाई...

सारे प्रयत्न ‘म्हादई’चा पूर्वापार प्रवाह अबाधित रहावा यासाठीच
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

म्हादई’ प्रकरणी उठलेल्या गदारोळात सामान्य माणसाची झालेली द्विधा परिस्थिती स्पष्टपणे दिसते आहे. म्हादईच्या पाण्यावर उठलेल्या या वादळात अनेकजण भरकटून गेले आहेत. मात्र त्यातही काही संवेदनशील लोक आहेत जे या समस्येकडे विचारपूर्वक पाहताहेत.

वेगवेगळ्या माध्यमातून त्याबद्दल चर्चा करताहेत. ‘म्हादई’ संबंधित निर्माण झालेल्या प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न जसा होतो आहे तसाच म्हादईकडे असलेले आपले जीवन तसेच भावनिक नाते व्यक्त करण्याचे प्रयत्नही सातत्याने होत आहेत. हे सारेच प्रयत्न ‘म्हादई’चा पूर्वापार प्रवाह अबाधित रहावा यासाठीच आहेत.

Mahadayi Water Dispute
CRZ Goa: शॅकधारकांकडून ‘सीआरझेड’चे उल्लंघन, नियम धाब्यावर

2018 मध्ये ‘बुकवर्म- गोवा’ ने एक सुंदर उपक्रम हाती घेतला - ‘द न्हंय: गोवा रिव्हर ड्रॉ!’ बुकवर्मने वेगवेगळ्या स्थानिक संस्थांबरोबर मिळून केलेल्या संयुक्त कामगिरीतून 14 मोठ्या आकाराची पॅनल रंगवून तयार झाली.

नदीकाठावर वसलेल्या वेगवेगळ्या गावांमधील सुमारे 500 गावकऱ्यांनी या उपक्रमात भाग घेऊन नदीबद्दलच्या आपल्या भावना प्रतिमांमधून मांडल्या. अशाप्रकारचा सामुदायिक उपक्रम (कम्युनिटी अ‍ॅक्टिव्हिटी) गोव्यात क्वचित घडतात.

सामान्य लोकांच्या डोळ्यांमधून म्हादई आणि तिच्या उपनद्यांकडे पाहण्याचा हा प्रयत्न होता. या साऱ्या प्रतिमांचे प्रदर्शन 23 फेब्रुवारीपासून पाटो येथील कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालयात सुरु झाले आहे.

Mahadayi Water Dispute
Olive Ridley Turtle: मोरजी किनाऱ्यावरील ‘त्या’ पार्टीवर कारवाई होणार : विश्‍वजीत राणे

म्हादई नदीचा प्रवाह बदलण्याच्या हालचाली होत असताना आणि सबंध गोवा एका अनैसर्गिक धक्क्याला सामोरे जात असताना भरले गेलेले हे समयोचित प्रदर्शन गोव्यातील लोकांचे, त्यांच्या नद्याबद्दल, विशेषत म्हादई नदीबद्दल असलेले प्रेम आणि नाते किती सखोल आहे हे दर्शवते.

हा उपक्रम चालू असताना म्हादईसंबंधी ज्या घटना घटत होत्या, जे राजकारण म्हादईभोवती फेर घेत होते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या विकासाच्या प्रक्रियेबद्दल अनेकांना वाटत असलेल्या चिंतेची तीव्रता वाढली होती आणि त्यामुळे ‘न्हंय’ प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद एकप्रकारे म्हादईचे बहुस्तरीय आणि बहुआयामी दस्ताऐवजीकरण बनून गेले.

केवळ दृश्‍य अर्थाने नव्हे तर नदीचे अस्तित्व, तिचा इतिहास, तिच्या भोवतालचे सूक्ष्म सजीव जग यांचे संरक्षण होण्यासंबधी जागरुकताही या काळात वाढत होती हे या उपक्रमाचे एक यश नक्कीच आहे.https://www.youtube.com/watch?v=yFgj5ZxzFh4

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com