School  Dainik Gomantak
गोवा

Mandrem: मांद्रे हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

पुढील काळात विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा अभ्यास करून आवडीच्या क्षेत्रात करियर संधी शोधावे व भविष्य घडवावे

गोमन्तक डिजिटल टीम

मराठी अकादमीचा हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन भाषेशी नाते सिद्ध केले. पुढील काळात उपलब्ध संधीचा अभ्यास करून आवडीच्या क्षेत्रात करियर संधी शोधा व भविष्य घडवा, मग तो शिक्षकी पेशासुद्धा असू शकतो, असे प्रतिपादन मांद्रे हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेक बोडके यांनी केले.

गोवा मराठी अकादमी पणजी व मांद्रे प्रभाग समिती आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मांद्रे हायस्कूलच्या सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या सोहळ्यात दहावी व बारावी मिळून 80 मुलांचा गौरव केला. व्यासपीठावर श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यामंदिराचे प्राचार्य गजानन मांद्रेकर, गोवा मराठी अकादमी मांद्रे प्रभागाचे अध्यक्ष नरेंद्र नाईक, मोरजी विद्याप्रसारक हायस्कूलचे मुख्यध्यापक दिलीप मेथर, प्रभाग सचिव सुभाष शेटगांवकर होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव केला. हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या शिक्षिका पूजा बांधकर व हायर सेकंडरीचे अध्यापक स्वप्नील शेटगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका दिया गडेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिक्षक दिलीप म्हामल यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका सुजाता पार्सेकर व स्नेहा बुडके तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना परब व शिक्षिका फेलेशिया फेर्नांडिस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT