Goa Culture : मगर आणि माणूस; एक बंधन

मगरी फक्त नदीत असतात असे नाही तर ओढे, मानस, तळी अश्या विविध जलशयातसुद्धा त्या सर्रास सापडतात.
Crocodile
CrocodileDainik Gomantak

श्रीचरण देसाई

काही वर्षांपूर्वी मगरींसंबंधी माहीती मिळवण्यासाठी मी निरंकाल आणि कोडार या शेजारीशेजारी असणार्या गावात फिरत होतो. दूधसागर नदीच्या काठावर वसलेले ही निसर्गरम्य गावे मुख्यतः शेती आणि इतर बागायती व्यवसाय करून पोट भरणारी. शेती आणि फोंडा किंवा मडगाव भागात नोकरी असे सर्वसाधारण इथल्या घरांमधले चित्र होते.

ज्यांचा नदीशी थेट संबंध येतो अशाना, उदाहरणार्थ, नदीवर कपडे धुणाऱ्या माता-भगिनी किंवा काठावर शेती करणार्या सर्वांना मी एकच प्रश्न विचारत होतो, ‘इथे मगरी आहेत ? आहेत तर मग त्या हल्ला करतात का?’ या प्रश्नांना मिळणारे उत्तर आश्चर्यकारक होते.

मगरी तर तिथल्या नदीत खूप असल्याचे सांगितले गेले. पण, हल्ला?.....अजिबात नाही. हे मला पटणारे नव्हते. माझी कुतूहलापोटीची भूक तशीच ठेवून मी माझे सर्वेक्षण चालूच ठेवले. पुढे जाऊन खूप माहिती मला लोकांकडून मिळाली; मगरी फक्त नदीत असतात असे नाही तर ओढे, मानस, तळी अश्या विविध जलशयातसुद्धा त्या सर्रास सापडतात.

गावोगावी मगर-मनुष्य संवाद/सहजीवनाचे सर्वेक्षण करताना एक खूपच दुर्लभ अशा एका प्रथेबद्दल मला कळले- ती म्हणजे, ‘मानगे थापणे’! मानगे म्हणजे मगर आणि थापणे म्हणजे माती थापून घडविणे.

आपल्या गोव्यात....

फोंडा तालुक्यात अशी मगरीची पूजा होते हे खूप कमी जणांना ठाऊक असावे. फोंड्यातील दुर्भाट, तळावली, अडूळशे, बोरी इ. गावात आजतागायत ही परंपरा चालू आहे. मी गेल्या ४ वर्षांपासून नित्यनेमाने ह्या वार्षिक ग्रामविधीला हजेरी लावतो. ही प्रथा शेकडो वर्षांपासून चालू असल्याचे इथले वडीलधारी मंडळींकडून सांगतात. अडूळशे गावातील विठू काकांनी तर महाभारतापर्यंत ह्या प्रथेची मुळे असल्याचे सांगितले. कथा खूप आहेत आणि गावकऱ्यांकडून ऐकण्यात वेगळीच मजा असते.

पौष महिन्याच्या अमावस्येला (मौनी अमावस्या) मानगे थापणें साजरी करतात. गावातील काही विशिष्ट मंडळी वर्षपद्धतीप्रमाणे त्यात सहभागी होतात. खारफुटीच्या बांधावर ही पूजा केली जाते. बांधावरचा ओला चिखल काढून अवघ्या 1 तासात सुदंर अशी मगरीची प्रतिमा घडविली जाते. हे चिखल-शिल्प त्यानंतर शिंपले आणि उपलब्ध काटेकुटे वापरून सजविले जाते.

Crocodile
Vegetable Market: गावठी भाजीला वाढती मागणी, टोमॅटोत चढउतार

मगरीला नैवद्य रूपाने कोंबडी किंवा अंडे दिले जाते. कुरमुरे आणि गूळसुद्धा अर्पण होतो. ‘वर्षभर बांधावर वावरणाऱ्या सर्वांचे रक्षण कर आणि कल्याण कर’ असे गाऱ्हाणे घालून प्रसाद वाटप होते. पुजेशी निगडित प्रत्येक कुटुंबाची अनोख्या पद्धतीने हजेरी घेतली जाते आणि गैरहजर असलेल्या कुटुंबाला शिक्षा म्हणून 1-5 दिवस शेतात काम करण्याची सक्ती असते. हा सगळा कार्यक्रम 2-3 तासात आटोपून सर्व आपल्या घरी परततात. गावातल्या प्रमुख उत्सवापैकी हा एक उत्सव मानला जातो

Crocodile
No Parking Zone: अवैधरित्या पार्किंगवर कारवाईची मागणी

मगरीवर अभ्यास करणाऱ्या काही विद्वानांनी ‘मानगे थापणे’बद्दल असंबद्ध आणि अपूर्ण माहिती टाकून शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. उदा. या पूजेत गावडा समाजाचे बांधव सामील होतात, महिलांना प्रवेश नसतो वगैरे. हे पूर्णपणे खोटे आहे. हा विधी करण्यासाठी विविध ज्ञाती बांधव तसेच ख्रिश्चन मंडळीसुद्धा सहभागी होतात. यात सहभागी होणारे सर्वजण शेती किंवा मासेमारीसाठी तिथल्या खारफुटीच्या परिसरावर अवलंबून असतात.

Crocodile
Goa Culture: गाल्फ महोत्सवात कुणबी साडी

अशा परंपरा माणूस आणि वन्य प्राणी ह्यांचे नाते बळकट करण्यासाठी खूपच पूरक ठरतात. या अलौकिक नात्याचा आविष्कार मानगे थापून, 21 जानेवारी रोजी पार पडला. खेडोपाडी वारूळरुपी असलेली शांतादुर्गा, भगवती असो किंवा पवित्र देवराई असो...आम्हा गोवेकरांना हे सर्व प्रिय आणि पूज्य असते. निसर्ग, पशु-पक्षी यांच्याबरोबरच्या मानवी नात्याच्या या प्राचिन काळच्या खुणा आहेत. आपण त्या जपायला हव्यात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com