Pali Waterfall Injured Student Dainik Gomantak
गोवा

Pali Waterfall: ट्रेकिंगसाठी आलेला १४ वर्षांचा विद्यार्थी पडून जखमी; पाली धबधब्यावरील दुर्घटना

Pali Sattari: जवानांनी आपल्या खांद्यांवर ट्रेचर्सच्या साहाय्याने विद्यार्थ्याला सुरक्षित आणून नंतर १०८ रुग्ण वाहिकेने वाळपई सरकारी इस्पितळात दाखल केले

गोमन्तक डिजिटल टीम

Pali Waterfall Accident

वाळपई: पाली-सत्तरी येथे विद्यार्थी धबधब्यावर जाताना पडून जखमी होण्याची घटना घडली. वाळपई अग्निशमन दलाशी दुपारी १२.४५ वाजता संपर्क साधला असता, जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

उपचारासाठी रुग्णवाहिकेने वाळपई सरकारी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रुवीन परेरा (वय वर्षे १४) असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या एका पायाला दुखापत झाल्याने त्याला नीट चालता येत नव्हते. जवळपास ९० जणांचा ग्रुप पाली धबधब्यावर ट्रेकींगसाठी आला होता.

दलाचे सतीश नाईक, आदम खान, दत्ताराम देसाई, एस. एन. गावस, डी. एस. सावंत यांनी सहकार्य केले. ८ वी व ९ वीचे विद्यार्थी ट्रेकिंगसाठी आले होते. जवानांनी आपल्या खांद्यांवर ट्रेचर्सच्या साहाय्याने विद्यार्थ्याला सुरक्षित आणून नंतर १०८ रुग्ण वाहिकेने वाळपई सरकारी इस्पितळात दाखल केले. व नंतर पुढे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT