Student commits suicide by jumping into river in Borim Dainik Gomantak
गोवा

बोरीतील नदीत उडी घेत विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: बोरी येथील जुन्या पुलाच्या खाली झुवारी नदीच्या पात्रात फातोर्डा-मडगाव येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज (शनिवारी) दुपारी आढळला. माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. मयत विद्यार्थ्याचे नाव आर्यन राजेंद्र बरड (18) असे असून तो मठरस्ता घोगळ-फातोर्डा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा बारावीत शिकत होता व पुढच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा असल्याने तो तणावाखाली होता. आज सकाळी तो घरातून गायब झाल्याचे निदर्शनास येताच बरड कुटुंबीयांची धावपळ उडाली. आर्यनचा सगळीकडे शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. दुपारी त्याचा मृतदेह बोरी येथे पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचनामा करण्‍यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

मडगावातील बेताळभाटी तळ्यात विद्यार्थ्याचा बुडून मृत्‍यू

बेताळभाटी येथे तळ्यात बुडल्याने एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. हा मुलगा काल घरातून बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह तळ्यात सापडला. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू करण्‍यात आली. तो मुलगा तळ्याकडे कसा पोहोचला याचे गूढ अजून उलगडलेले नाही. या प्रकरणी कोलवाचे पोलिस उपनिरीक्षक अजित वेळीप अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT