Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa Election: विद्यार्थी मंडळाची निवडणूक 10 किंवा 11 जानेवारीला

Goa Election: गोवा विद्यापीठाची खंडपीठाला माहिती

दैनिक गोमन्तक

Goa Election: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची निवडणूक 10 किंवा 11 जानेवारी 2024 रोजी निश्‍चित करण्यात येईल. डिसेंबर महिन्यात विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या परीक्षा व इतर काही कार्यक्रम असल्याने त्या घेणे शक्य नाही,अशी माहिती गोवा विद्यापीठातर्फे देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला मान्यता देत मूळ याचिकेवरील सुनावणी येत्या 28 नोव्हेंबरला ठेवली आहे. गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी केलेल्या वेळेच्या वाढीला एनएसयूआयच्या उमेदवारांनी आव्हान देणारी याचिका सादर केली आहे.

मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने मंडळाची नियोजित ३ नोव्हेंबरची निवडणूक रद्द केली होती व नवी तारीख ६ नोव्हेंबरला घोषित करण्याचे निर्देश गोवा विद्यापीठाला दिले होते. त्यानुसार गोवा विद्यापीठाने ही माहिती आज खंडपीठाला दिली.

गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळ निवडणुकीसाठी विविध महाविद्यालयातील विद्यापीठ शाखा प्रतिनिधींच्या 80 पैकी 42 जणांना पात्र ठरवून यादी तयार करण्यात आली होती. 32 जणांना विद्यार्थी कल्याण संचालनालयाने अपात्र ठरविले होते. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत वेळ होती.

या दिवशी ही वेळ संपण्यास वीस मिनिटे बाकी असताना या संचालनालयाने अधिसूचना काढून ही वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवली. या वाढीव वेळेत ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. 32 पैकी ज्या 20 जणांचा निवडणूक यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यातील 9 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या 9 पैकी 7 जणांचा सुरुवातीच्या 42 जणांच्या यादीत समावेश होता. त्यामुळे त्यांनी 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत संधी असताना त्यांनी ती घेतली नाही. वेळेत वाढ केल्यानंतर त्यांनी हे अर्ज केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lotulim Shipyard Accident: नौका बांधताना उडाला आगीचा भडका, 5 जणांचा मृत्यू; ‘विजय मरीन’ च्या संचालकासह दोघे अटकेत

Water Shortage: 'पाणी येईपर्यंत गप्प बसणार नाही'! सावर्डेत 8 दिवसांपासून नळ कोरडे; ग्रामस्थांचा पाणीपुरवठा विभागाला इशारा

Goa Farmer Aid Fund: पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! भरपाईसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

Goa Crime: धक्कादायक! नोकरी देतो सांगून करायचा अत्याचार, पीडित युवतींचा हवालासाठी ‘कुरियर गर्ल्स’ म्‍हणून करायचा वापर

Goa Electricity Tariff: घरगुती वीज ग्राहकांना दिलासा! वेळेनुसार दरवाढ तूर्त नाही; मंत्री ढवळीकर यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT