Bambolim Goa 
गोवा

Goa AAP: का झाला कुजिरातील मुलांत वाद? आम आदमी पक्षाने सांगितले कारण

Goa AAP: राज्यातील युवकांना रोजगार मिळत नाही. निवडणुकीपूर्वी दहा हजार नोकऱ्या देणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले, असे कुएल्हो म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa AAP

कुजिरा शैक्षणिक संकुलात बुधवारी झालेल्या मुलांमधील वादामागे युवक बेरोजगारीमुळे त्रस्त झाल्याचे कारण असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील भाजप सरकार युवकांना नोकऱ्या आणि रोजगार मिळवून देण्यास अपयशी ठरलेले आहे.

बेरोजगारी हेच यामागील मूळ कारण असल्याचे मत ‘आम आदमी पक्षा’च्या नेत्यांनी व्यक्त केले. ‘आप’च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस फ्रान्सिस कुएल्हो, सर्फराज शेख, नेटन डिसोझा आणि रुई मिनेझिस यांची उपस्थिती होती.

कुएल्हो म्हणाले, कुजिरा परिसरातील मारहाणीचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. त्यात चाकू घेऊन धावणारा मुलगा दिसतो किंवा त्याच्याबरोबर जी मुले आहेत त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे, त्यांना पोलिसांनी मारू नये. त्यांचे समुपदेशन करावे अन्यथा ते गुंडगिरीकडे वळतील.

या व्हिडिओतील मुले ही नोकरी नसल्याने त्रस्त झालेली दिसत आहेत. काहींच्या घरातील कोणी नोकरीस नाही, अशी स्थिती आहे. राज्यातील युवकांना रोजगार मिळत नाही. निवडणुकीपूर्वी दहा हजार नोकऱ्या देणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले, असे कुएल्हो म्हणाले.

तिघांना ६ दिवस पोलिस कोठडी

बांबोळीतील कुजिरा शैक्षणिक संकुलात झालेल्या चाकूहल्ला प्रकरणात तिन्ही संशयित झाकुल्ला काझी, ज्योसुआ झेवियर आणि शोएब बेग यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

आगशी पोलिसांनी तिघांना गुरुवारी (ता.४) पणजीतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Gen Z Protest: नेपाळ देशात आता लष्कराची हुकूमत; फ्रान्समध्येही सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष, पोलिस बळाचा वापर

Goa Crime: नारळ ठेवण्यासाठी वाकल्या अन् सोने लुटले, भक्त बनून आलेल्याने मयेत फुलविक्रेतीला लुटले; अडीच लाखांची माळ लांबविली

ED Raid Goa: चड्डी-बनियनवर आसगावात फिरणारा अचानक झाला 'गोल्ड मॅन', 1,200 कोटीच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ची कारवाई; लक्झरी गाड्या जप्त

GCA Election: चेतन-बाळू गटाने रोहन यांना गाठले खिंडीत, 'GCA' निवडणुकीतून माघार न घेतल्‍यास 'BCCI'चे पद संकटात

Goa: दिवाडीत ‘कोटीतीर्थ कॉरिडॉर’! एक हजार मंदिरांचे प्रातिनिधिक स्मारक; संग्रहालयही उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT