Canacona Trinamool Dainik gomantak
गोवा

काणकोणात तृणमूल काँग्रेसला बळकटी

गोव्यात केवळ तृणमूल काँग्रेसच भाजपचा पराभव करू शकतो..

दैनिक गोमन्तक

काणकोण गट समितीचे माजी सचिव तथा माजी महापौर महादेव देसाई यांच्यासह काणकोण काँग्रेसच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तृणमूल (TMC) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला आणखी बळकटी मिळाली आहे.

पक्षाच्या पणजी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा, म​हिला प्रदेशाध्यक्ष अविता बांदोडकर आणि युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर यांनी महादेव देसाई यांच्यासह काँग्रेस गट समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र वेळीप व इतर कार्यकर्त्यांना पक्षात रितसर प्रवेश दिला.

सद्यस्थितीत गोव्यात केवळ तृणमूल काँग्रेसच भाजपचा (BJP) पराभव करू शकतो. तळागाळातील गोमंतकीयांसाठी काम करू शकतो याची खात्री पटल्यामुळेच आपण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) तृणमूल निश्चित भाजपचा पराभव करून गोव्यात नवी सकाळ उगवेल, असा ठाम विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे. सुमारे 20 वर्षे आपण काँग्रेससाठी काम केले. परंतु, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने काणकोणात आपल्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी दिली. पुढे तीच व्यक्ती जिंकून आल्यानंतर भाजपात गेली, असेही त्यांनी नमूद केले.

काणकोणातील (Canacona) काँग्रेस नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे तृणमूल पक्ष आणखी बळकट झाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल असेच निर्णय काँग्रेस घेत आहे. जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ते सिद्धही करून दाखवले आहे. काँग्रेसकडे कोणतीही ध्येयधोरणे नाहीत. हे लक्षात येत असल्यामुळेच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत, असेही बांदोडकर म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT