Sanjay Raut Utpal Parrikar
Sanjay Raut Utpal ParrikarDainik Gomantak

उत्पल पर्रीकरांसाठी शिवसेना पणजीतून माघार घेणार?

भाजपला राजीनामा देत उत्पल पर्रीकरांचा अपक्ष लढण्याचा निर्णय
Published on

पणजी : स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे गोव्यासाठीचे योगदान मोठे आहे. तरीही भाजपने त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारली आहे. हा त्याचा भाजपअंतर्गत विषय आहे. मात्र उत्पल भाजपच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असतील आणि निवडणुकीनंतर ते भाजपात जाणार नसतील तर शिवसेना पणजीतील आपली उमेदवारी माघारी घेईल असे मत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. पणजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

Sanjay Raut Utpal Parrikar
उत्पल पर्रीकरांच भावनिक वक्तव्य, भाजपवर टीकास्त्र

दरम्यान, भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आज अखेर भाजपला राजीनामा देत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय आज पत्रकार परिषद घेत व्यक्त केला. त्यामुळे शिवसेना आता काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले पणजी मतदारसंघांमधून शिवसेनेतर्फे शैलेंद्र वेलिंगकर निवडणूक लढवतील मात्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आल्यानंतर भाजपात (BJP) जाणार नाही असं जनतेला आश्वासन दिले तरच शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. त्यामुळे शिवसेना आता काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com