CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Issue: 'म्हादईबाबत गोव्याची न्यायालयीन अन् तांत्रिक बाजू मजबूत' -मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant on Mahadayi Water Dispute: जल आयोगाने कर्नाटकला दिलेली डीपीआर मंजुरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बॅकफूटवर गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा म्हादईबाबत राज्याची तांत्रिक आणि न्यायालयीन बाजू मजबूत असून आम्ही ही लढाई जिंकू, असा पुनरुच्चार केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी हुबळी येथील जाहीर सभेत गोव्याच्या संमतीनेच म्हादईच्या पाणीवाटपाचा प्रश्न सोडवल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे एकूणच मुख्यमंत्र्यांसह गोव्यातील भाजप सरकार बॅकफूटवर गेले आहे.

अशा स्थितीत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, म्हादईबाबत राज्याची तांत्रिक आणि न्यायालयीन बाजू भक्कम आहे. आम्ही आमच्याकडील सर्व पुराव्यांनिशी सर्वोच्च न्यायालयाला आमची बाजू पटवून देऊ. न्यायालय आम्हाला नक्कीच न्याय देईल, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

पंचायतींच्या ठरावांचे स्वागत : गुदिन्हो

म्हादईप्रश्‍‍नी आता राज्‍यातील पंचायतींमध्ये ठराव घेण्यास सुरुवात झाली आहे. म्हादईचा विषय हा लोकांच्या भावनेशी निगडित असून पंचायतींमध्ये घेतलेल्या ठरावांवरून लोक आपले मत व्यक्त करत आहेत.

माझ्या मतदारसंघातील चिखली पंचायतीने सर्वप्रथम ठराव घेतला होता. तसेच आता राज्यातील इतर पंचायतींमध्ये ठराव घेतले जात असून याचे स्वागत आहे, असे वक्तव्‍य पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रमाकांत खलप, चीन आणि लोकशाही; प्रमोद महाजनांचा 28 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

Goa Assault Case: धारबांदोड्यात प्राणघातक हल्ला करुन एकास लुटले, दोघांविरोधात गुन्हा नोंद

Israel VS Spain: इस्रायलविरुद्ध स्पेन उतरला मैदानात, संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात अर्ज दाखल; केला मोठा आरोप

Goa Today's News: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता हटवली

Cyber Crime Goa : सायबर क्राईम ः त्रस्त गोवेकरांची कथा आणि व्यथा

SCROLL FOR NEXT