Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सभापती पदासाठी विरोधी पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी

रंगत वाढली: काँग्रेसतर्फे आलेक्स सिक्वेरा यांचा अर्ज सादर

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभेत भाजपकडे बहुमत असून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभापती पदासाठी विरोधी पक्षही आक्रमक होणार असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधी कॉंग्रेसने सभापतीसाठी आपला उमेदवार जाहीर केला असून नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे पुरेसे संख्याबळ असूनही भाजप गोटात चर्चेला उधाण आले आहे. सिक्वेरा यांना कॉंग्रेसबरोबर गोवा फॉरवर्ड, ‘आप’ आणि ‘आरजी’च्या आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधकांनी सभापती पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे दिसत आहे.

आज विधानसभा सचिव नम्रता उलमन यांच्याकडे कॉंग्रेसचे सभापती पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून आलेक्स सिक्वेरा यांनी आपले नामांकन सादर केले. यावेळी कॉंग्रेस नेते दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या उमेदवाराला गोवा फॉरवर्ड, ‘आप’ आणि ‘आरजी’च्या आमदारांचा पाठिंबा लाभलेला असून ही विरोधकांची एकजूट आहे. विजय सरदेसाई आणि वीरेश बोरकर यांनी आपण विरोधी बाकावर बसण्यास सज्ज असल्याचे सांगत सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस जो निर्णय घेईल, तो मान्य करून आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.

- दिगंबर कामत

काँग्रेसने ठरवलेल्या रणनीतीनुसार सभापतीपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत मतविभाजन होऊन आमचाच उमेदवार निवडून येईल, याची मला खात्री आहे.

- मायकल लोबो, आमदार, काँग्रेस.

काँग्रेसच्या निर्णायक नीतीनुसार आणि पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मी सभापती पदाचा अर्ज भरला आहे. विधानसभेत विरोधी पक्षांची सदस्य संख्या कमी असली तरी आम्ही विजयी होऊ, याची आम्हाला खात्री आहे.

- आलेक्स सिक्वेरा, आमदार, नुवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT