CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सरकारी खात्यांमध्‍ये कामे का रेंगाळतात? मुख्यमंत्र्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बहुतांश सरकारी कर्मचारी आणि अधिकारीसुद्धा कामचुकारपणा करत असल्‍यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. हा मुद्दा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फारच गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी आज भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन ‘कर्तव्‍यात कसूर करू नका’ असा आदेश दिला.

‘सरकारी खात्यांमध्‍ये कामे का रेंगाळतात याची कारणे द्या’ असे मुख्‍यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा ते अधिकारी निरुत्तर झाले. प्रत्येक खात्याला सचिव का असतो? त्या सचिवाचे काम काय असते? आदी प्रश्‍‍नांचा भडिमार त्‍यांनी केला. त्यावेळी अधिकाऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरील परिषद सभागृहात त्‍यांनी ही बैठक घेतली.राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

प्रशासनाची ढासळलेली बाजू रुळावर आणण्‍यासाठी गेल्‍या काही दिवसांपासून मुख्‍यमंत्री आक्रमक बनले असून आज विविध सरकारी विभागांच्‍या उच्चपदस्‍थ अधिकाऱ्यांसोबत त्‍यांनी दोन तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी त्‍यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

विधानसभा अधिवेशन काळात आलेल्या मुद्यांचा उल्लेख करून प्रशासन कोलमडल्याचे चित्र विरोधकांनी विधानसभेत निर्माण केले याकडे मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विरोधकांनी मांडलेले मुद्दे टिपून घेतले होते. त्या मुद्यांच्या आधारे मुख्यमंत्री या बैठकीत बोलत होते. एकही खाते व्यवस्थित काम करत नसल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला व त्‍यात ते बहुतांशी यशस्‍वीही झाले, ही बाबही मुख्‍यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्‍या नजरेस आणून दिली.

विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात कौशल्य विकास कार्यालयाला आकस्मिक भेट देण्यासह आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली होती. सरकारी खात्यांकडून जनतेला मिळणाऱ्या सेवेसंदर्भात अधिवेशनात विरोधकांकडून टीका झाली होती. सरकारच्या तसेच केंद्राच्या विविध योजनांचा लाभ जनतेला वेळेत मिळण्यात होणाऱ्या विलंबाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. राज्यात ‘जनता दरबार’ तसेच ‘संडे डायलॉग’ सुरू करून विरोधक लोकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्‍यांनी उपस्‍थित अधिकाऱ्यांना ‘धडे’ दिले.

खात्‍यांना भेटी देऊन लोकांचे प्रश्‍‍न सोडवा

खात्याचा प्रमुख हा सचिव असतो. आपल्या खात्यात जनतेची किती कामे शिल्लक आहेत याचा आढावा दर महिन्याला तरी घेण्यात येतो का? तसे होत नसल्यास

दर महिन्याला सचिवाने केवळ संचालकांकडून नव्हे तर संबंधित कर्मचाऱ्यांशीही संवाद साधून माहिती जाणून घ्‍यावी, असा आदेश त्‍यांनी दिला. सचिवांनी महिन्यातून एकदा आपल्या खात्याच्या कार्यालयांना भेटी द्याव्यात. केवळ पणजी, पर्वरीतील कार्यालये नव्हे तर मडगाव आणि तालुका पातळीवरील कार्यालयांनाही अचानक भेटी द्यावात. तेथे बैठका घेऊन सोडविता येण्यासारखे प्रश्‍‍न तेथेच सोडवावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महसूल वाढवा, अंगी शिस्‍त बाणवा!

बैठकीत साधनसुविधा प्रकल्पांचाही आढावा घेण्‍यात आला. विविध खात्यांमार्फत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करण्याबरोबरच महसूल वाढविण्यावरही जोर देण्‍यात आला. केंद्र सरकारच्या योजनांची कार्यवाही कशा प्रकारे सुरू आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT