Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दारुची तस्‍करी रोखण्‍यासाठी पोळे चेक नाक्‍यावर कडक पोलीस गस्‍त

Goa Police: दारूची तस्‍करी रोखण्‍यासाठीपोळे चेकनाक्‍यावर बंदोबस्‍त10 पोलिसांचे पथक : दिवस-रात्र वाहनांची तपासणी

Shreya Dewalkar

Goa Police:

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर गोव्‍यातून कर्नाटकात दारू तसेच अन्‍य वस्‍तूंची तस्‍करी होऊ नये तसेच बाहेरूनही राज्यात अवैध वस्तू येऊ नयेत यासाठी काणकोण पोलिसांनी कडक उपाययोजना हाती घेतली असून पोळे-काणकोण येथील चेकनाक्‍यावर कडक पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

कर्नाटकातून ये-जा करणाऱ्या प्रत्‍येक वाहनांची या चेकनाक्‍यावर कसून तपासणी करत असून दिवस-रात्र हा पहारा चालू आहे. यासाठी दहा पाेलिसांचे पथक चेकनाक्‍यावर तैनात करण्‍यात आले आहे.

वाहनांच्‍या हालचालीवर निगराणी ठेवण्‍यासाठी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात असून काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही गस्‍त चालू आहे. या पथकात दोन साहाय्‍यक पोलिस निरीक्षक, एक हवालदार, दोन पोलिस शिपाई आणि तीन गृहरक्षक दलाचे जवान यांचा समावेश आहे.

तपासणीशिवाय वाहन सोडू नये

गोव्‍यातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून गोव्‍यात येणाऱ्या प्रत्‍येक वाहनाची या पथकाकडून तपासणी केली जाते. या पथकाला साहाय्‍य करण्‍यासाठी निवडणूक विभागातूनही एका पाेलिस शिपायाची नियुक्‍ती केली आहे.

दारूची अवैध वाहतूक थांबविण्‍यासाठी फक्‍त चेकनाकाच नव्‍हे तर कर्नाटकात जाणाऱ्या अन्‍य वाटाही बंद करण्‍यात आल्‍या आहेत. प्रत्‍येक वाहनांची तपासणी केल्‍याशिवाय त्‍यांना सीमा ओलांडण्‍यास देऊ नये, अशी सक्‍त ताकीद देण्‍यात आल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक राऊत देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT