Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Fake Dentists: किनारी भागात काम करणाऱ्या तोतया दंतवैद्यांवर करणार कठोर कारवाई

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन: परदेशी पर्यटकांची फसवणूक

दैनिक गोमन्तक

Fake Dentists In Goa: गोव्याच्या किनारी भागात काम करणाऱ्या तोतया दंतवैद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. अशा फसवणूक करणाऱ्या दंत चिकित्सकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी डेंटल असोसिएशनने पुढे यावे, ज्यामुळे इतर खऱ्या दंतवैद्यांची प्रतिमा खराब होण्यापासून वाचेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

18 व्या गोवा स्टेट इंडियन डेंटल असोसिएशनच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डेंटल असोसिएशनच्या सदस्यांना पुढे येऊन राज्याच्या किनारी भागात कार्यरत असलेल्या आणि परदेशी पर्यटकांची जास्त रक्कम आकारून फसवणूक करणाऱ्या तोतया दंतवैद्यांच्या विरोधात तक्रार करण्यास प्रोत्साहित केले.

मुख्यमंत्री म्हणाले, किनारी भागात कार्यरत अशा तोतया दंतवैद्यांविरुद्ध काही तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत ज्यांच्याकडे दंतचिकित्सा करण्याची पात्रता नाही आणि ते निष्पाप परदेशी पर्यटकांची फसवणूक करत आहेत.

डेंटल असोसिएशनने तक्रार करावी

मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले की, हे फसवणूक करणारे दंतवैद्य बिगर गोमंतकीय आहेत. त्यांच्या फसवणुकीमुळे गोव्यातील खऱ्या दंत चिकित्सकांचे नाव खराब होईल. त्यामुळे डेंटल असोसिएशनने पुढे येऊन अशा फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करणे आवश्यक आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस या दंतवैद्यांवर आवश्यक ती कारवाई करतील, असे आश्वासन सावंत यांनी दिले. असल्या दंतवैद्यांवर कठोर कारवाईची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT