Goa Monsoon: राज्यात पुढील चार दिवस पावसाची विश्रांती

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान काहीसे कोरडे राहिल्याने पुढील ४ दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे.
Goa Monsoon Update 2023
Goa Monsoon Update 2023Dainik Gomantak

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान काहीसे कोरडे राहिल्याने पुढील ४ दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. दरम्यान, तापमानात मात्र घट होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Goa Monsoon Update 2023
Porvorim Accident : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचे अपयश गुन्हेगारी, अपघातांमुळे उघड

यंदा पावसाच्या हंगामात राज्यात अनेक चढउतार दिसून आले. राज्यातील पावसाचे वर्तन पाहता सप्टेंबरमध्ये एकूण पावसाच्या केवळ ११ टक्के पाऊस पडतो असे दिसून आले आहे. राज्यात या हंगामात आत्तापर्यंत २७३५.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना २७७८.७ मि.मी. पाऊस झाला आहे.

Goa Monsoon Update 2023
vijai sardesai: लोकसभा निवडणूक निकालापेक्षा धार्मिक सलोखा राखणे महत्त्वाचे

आता सप्टेंबरमधील पाऊस हा राज्यासाठी बोनस ठरणार आहे. उद्या ४ सप्टेंबरनंतर तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गोव्यासाठी चांगले असेल. एन निनोच्या प्रभाव राहिला तरीही पाऊस पडू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com