weighing department Officers Raid Dainik Gomantak
गोवा

Goa : वजनमाप खात्याची धडक कारवाई; 44 ठिकाणी छापे

गोव्यात मोहीम सुरु; आवश्‍यक माहितीचा अभाव, वजनात तफावत असल्याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa : गणेशोत्सव सणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध भागात विक्री करण्यात येत असलेल्या दुकानांमधील पॅकेज्ड वस्तूंवर नियमांनुसार सविस्तर माहिती नसल्याने वजनमापे खात्याच्या विविध पथकांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असूनही खात्याच्या अधिकाऱ्यांनी 44 ठिकाणी एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई केली. त्यामध्ये २३ पॅकेज्ड तर 20 नियमांचे उल्लंघन केलेल्या प्रकरणांचा समावेश आहे.

काही पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादनाची तारीख, उत्पादन करणाऱ्याचे नाव तसेच ते किती दिवस खाण्यास योग्य याची माहिती नमूद केलेली नसते तर काही खाद्यपदार्थावरील पाकिटावर वजनापेक्षा प्रत्यक्षात वजन कमी असते. दक्षिण गोवाचे वजनमापे अधिकारी भूपेंद्र देसाई, आझेन रॉड्रिग्ज, विकास कांदोळकर यांनी नितीन पुरुषन यांच्या मार्गदर्शनाखाली हे छापे टाकले.

‘जागो ग्राहक जागो’

गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थ तसेच गृहोपयोगी वस्तू आल्या आहेत. या वस्तू खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाने सतर्क राहण्याची गरज आहे. खाद्यपदार्थ पाकिटावर नमूद करण्यात आलेल्या वजनापेक्षा अनेकदा त्याचे वजन कमी असते तर गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना पॅकेज्ड वस्तूच्या बॉक्सवर कंपनीचे नाव, उप्तादन तारीख, किरकोळ किंमत याची माहिती नसते. अशी तफावत जर खरेदी करताना आढळून आल्यास ग्राहकांनी जागृत व्हावे असे आवाहन खात्याच्या नियंत्रक प्रसाद शिरोडकर यांनी केले आहे.

डिचोली, सत्तरीतही मोहीम

1 पेडणे, बार्देश, डिचोली व सत्तरी या तालुक्यांमध्ये 18 दुकानधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 13 प्रकरणे पॅकेज्ड तर 5 ही वजनमापेमध्ये तफावत असलेली होती. ही कारवाई वजनमापे अधिकारी राजेश वेंगुर्लेकर, सिद्धेश शिरगावकर, केशवराज गोवेकर, आदित्य परब यांनी सहाय्यक नियंत्रक गुलाम गुलबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

2 तिसवाडी व फोंडा तालुक्यात 11 ठिकाणी कारवाई केली त्यामध्ये 7 पॅकेज्ड तर 4 वजनमापेमध्ये तफावर असलेली प्रकरणे होती. अधिकारी रजत कारापूरकर, विकास कांदोळकर यांनी सहाय्यक नियंत्रक देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT