'जागो ग्राहक जागो' मोहिमेअंतर्गत गोव्यात 50 लाखांचा माल जप्त

फोंड्यात राबवण्यात आलेल्या मोहिमेत 80 हजार रुपये किंमतीचा माल ताब्यात घेण्यात आला होता.
Officers
Officers Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: 'जागो ग्राहक जागो' या मोहिमेअंतर्गत वजनमाप खात्याने संपूर्ण गोव्यात वेगवेगळ्या आस्थापनांवर छापे टाकून 50 लाखांचा माल जप्त केला आहे. ही मोहीम मागील 2 दिवसात राबवण्यात आली आहे. (Goa News)

Officers
Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच

मागील काही दिवसात अशीच मोहीम फोंड्यात राबनवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील (Taluka) विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. तपास पथकाने तिस्क - उसगाव , म्हार्दोळ, कुंकळ्ये, फर्मागुडी, बांदोडा, शिरोडा आदी भागात 23 दुकाने व आस्थापनांची तपासणी केली. विविध ठिकाणच्या छाप्यात सुमारे 80 हजार रुपये किंमतीचा माल ताब्यात घेण्यात आला. यामध्ये कडधान्य तसेच इतर साहित्याबरोबरच वजन काट्यांचाही समावेश होता.

फोंडा (Ponda) वजनमाप खात्याचे अधिकारी शुबर्ट डीकॉस्टा तसेच देमू मापारी, विकास कांदोळकर या अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांसह हे छापे टाकले. 13 दुकानदारांकडे खात्याचा परवाना नसल्याचे आढळले. 4 कडधान्य दुकानांत वजन योग्य नसल्याचे आढळून आले. ही कारवाई वजनमाप अधिकारी अरुण पंचवाडकर व प्रसाद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com