Goa Food Stall Dainik Gomantajk
गोवा

मडगाव रेल्वे स्थानकाजवळ हटविलेले गाडे पुन्हा सुरू!

या गाड्यांविरुद्ध नगरपालिका पुन्हा काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकासमोरील पदपथावरील हटविलेले गाडे पुन्हा स्थापन करण्यात आले आहेत. या गाड्यांविरुद्ध नगरपालिका पुन्हा काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Street stalls removed near Madgaon railway station resume)

मडगाव नगरपालिकेने पालिका क्षेत्रात पदपथावर, रस्स्त्याच्या शेजारी बेकायदेशीरपणे चालत असलेल्या व्यवसायावर कारवाई करून ते हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. कोकण रेल्वे स्थानकासमोरील पदपथावरील पाव ऑम्लेट व इतर खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे मागील आठवड्यात कारवाई करून हटविण्यात आले होते. या दरम्यान पालिका कर्मचारी व गाडेवाले यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. तसेच परवाना असताना नगरपालिका राजकीय दबावाखाली येऊन कारवाई करीत असल्याचा आरोप येथील गाडेवाल्यांनी केला होता.

गाडे स्थापन न करण्याची तंबीही या गाडेवाल्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

या गाडेवाल्यांनी परवानगी घेऊन मागील 15 वर्षांपासून येथे व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा नगरपालिका या गाड्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात पदपथावर व्यवसाय करण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही मडगाव परिसरात पदपथ अडवून बेकायदेशीर व्यवसाय सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT