Buimpal Village Ground  Dainik Gomantak
गोवा

Pissurlem News: मैदानावर पाणीच पाणी, जमिनीची होतेय धूप; संरक्षक भिंतीची मागणी

Buimpal Village: भुईपालचे क्रीडाप्रेमी त्रस्त; जलस्रोत खात्याने लक्ष घालण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

भुईपाल गावातील युवकांना वरदान ठरणाऱ्या भेडशेवाडा येथील मैदानावर जवळील ओहोळाचे पाणी पसरत असल्याने क्रीडाप्रेमींना अडथळा निर्माण होत आहे, तसेच जोरदार पावसाच्या पाण्यामुळे ओहोळालगतच्या जमिनीची धूप होऊन मैदान अपुरे पडत आहे.

जलस्रोत खात्याने सदर ओहोळाच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला चालना द्यावी,अशी मागणी भुईपाल भागातील क्रीडाप्रेमींनी केली आहे. सदर ओहोळाच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्यासाठी पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ.दिव्या राणे यांच्या सहकार्याने जलस्रोत खात्याला प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती, पंच स्मिता मोटे यांनी दिली आहे.

सदर गावात असलेल्या सर्वे क्रमांक २६/१, या जमिनीतील काही भागात स्वखर्चाने मैदान तयार करून गेल्या कित्येक वर्षांपासून भुईपाल परिसरातील युवक अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करीत आहेत.

परंतु या जागेच्या एका बाजूला भला मोठा ओहोळ असून तो पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असल्याने सदर पाणी मैदानावर पसरत आहे. त्यामुळे मैदानावर कचरा तसेच काचेच्या वस्तू येऊन पसरत असल्याने क्रीडाप्रेमींच्या आरोग्याला धोका उद्‍भवत आहे.

सदर ओहोळातील पाण्याने मैदानालगतच्या जमिनीची धूप होऊन मैदान खेळण्यासाठी अपुरे पडू लागले आहे.या ओहोळाभोवती एका बाजूला लोकवस्ती असल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या या ओहोळाच्या पाण्याचा फटका त्या घरांनाही बसत आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सदर ओहोळाचे पाणी भेडशेवाडा या ठिकाणी जाणाऱ्या एका साकव वजा पुलावरून जात असल्याने साकवाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

मैदानाची निगा राखणे गरजेचे!

या मैदानावर गेल्या कित्येक वर्षांपासून भुईपाल गावातील दोन्ही प्रभागातील युवक उन्हाळ्यात व पावसाळ्यात विविध प्रकारच्या क्रीडास्पर्धांचे आयोजन करीत असतात, त्यामुळे सदर मैदानांची निगा राखणे गरजेचे आहे, असे मत भुईपाल भेडशेवाडा येथील रामा ताटे यांनी व्यक्त केले आहे.

स्मिता मोटे, पंचायत सदस्य

सदर ओहोळाच्या पाण्याचा फटका नागरिकांना तसेच या ठिकाणी असलेल्या मैदानाला बसत असल्याची दखल घेऊन पंचायत मंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन आमदार डॉ.दिव्या राणे यांच्या सहकार्याने डिचोली येथील जलस्रोत खात्याला पाठवला आहे, त्याप्रमाणे त्या खात्याने सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे, या विषयी आमदार डॉ.दिव्या राणे यांच्या कार्यालयातून या ओहोळाच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT