stray dogs vaccination Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs: पर्यटकांवर हल्ला, वाढती संख्या; गोव्यात 'भटक्या कुत्र्यांच्या' समस्येबाबत होणार चर्चा, मुख्‍य सचिव घेणार अधिकाऱ्यांची बैठक

Goa stray dogs: मुख्‍य सचिव डॉ. कंदावेलू सोमवारी सकाळी संबंधित खात्‍यांच्‍या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी रविवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस स्थानके, डेपो आणि रेल्वे स्थानक या सर्व परिसरातून भटक्या कुत्र्यांना तत्काळ हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने जारी केल्‍यानंतर त्‍यासंदर्भात ठोस उपाययोजना राबवण्‍यासाठी मुख्‍य सचिव डॉ. व्‍ही. कंदावेलू यांनी संबंधित खात्‍यांच्‍या सर्व अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी बोलावली आहे. त्‍यामुळे राज्‍यातील भटक्‍या कुत्र्यांवर लवकरच नियंत्रण येण्‍याची शक्‍यता आहे.

भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या वाढत असलेल्‍या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक क्रीडा संकुले, बस स्थानके, डेपो आणि रेल्वे स्थानके ओळखून आणि त्‍या ठिकाणी असलेली भटक्या कुत्र्यांची संख्या व स्थितीची नोंद घेऊन तत्‍काळ कारवाई सुरू करण्याच्‍या सूचना खंडपीठाने केल्‍या होत्‍या.

त्‍यानुसार मुख्‍य सचिव डॉ. कंदावेलू सोमवारी सकाळी संबंधित खात्‍यांच्‍या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी रविवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

विधानसभेतही चर्चा

पर्यटन राज्‍य असलेल्‍या गोव्‍यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर भटकी कुत्री टोळ्यांनी हल्ला चढवतात. त्‍यात अनेक पर्यटक जखमी होतात. त्‍याचा परिणाम राज्‍याच्‍या पर्यटनावर होत असल्‍याचा मुद्दा विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी उपस्‍थित केला होता. समुद्र किनाऱ्यांसह शैक्षणिक संस्‍था, रुग्‍णालयांच्‍या परिसरातही अशा कुत्र्यांची संख्‍या वाढत असल्‍याने त्‍यांच्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी सोमवारच्‍या बैठकीत चर्चा करण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

'पर्यटकांना खोल्या, घरे भाड्याने देत असताना कागदपत्र तपासा'! द. गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सूचना; चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध

Akshay Patra Yojana: ..आणखी 3 हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’! माध्यान्ह आहाराचा मुद्दा; वाढत्‍या मागणीनंतर शिक्षण खात्‍याचा निर्णय

Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार नूतन पंचायतघराला 'रवीं'चे नाव! ग्रामसभेत ठराव एकमताने संमत

Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT