Stray Dogs Attack in Goa Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांचा प्रश्न होतोय गंभीर; हल्ल्यांच्या, चावे घेण्याच्या प्रकरणांत वाढ, फोंड्यात 2 हजारांपेक्षा अधिक रुग्‍णांवर उपचार

Stray Dogs Problem In Goa: सुमारे १०० पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांचा संचार फोंड्यात असून स्थानिक लोकांसाठी ते धोकादायक ठरत आहे.

Sameer Panditrao

Stray Dogs Issue In Ponda Goa

फोंडा: नागा मशीद-कुर्टी परिसरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना चावे घेण्याच्या प्रकारणांत वाढ झाली आहे.

सुमारे १०० पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांचा संचार फोंड्यात असून स्थानिक लोकांसाठी ते धोकादायक ठरत आहे. त्‍यामुळे संबंधित खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी लोकांकडून होत आहे. नागा मशीद कुर्टी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर स्थानिक लोकांसाठी त्रासदायक बनला आहे. दिवस-रात्र रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडून लोकांना चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी परिसरात एका पाच वर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याकडून चावे घेण्याचा प्रकार घडला होता. हे कुत्रे लहान मुलांसाठी अधिक घातक बनले आहे. नागा मशीदसह हाऊसिंग बोर्ड कुर्टी परिसरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे.

न्‍यायालयीन निर्णयामुळेच हिंस्र कुत्र्यांवर आणू शकत नाही बंदी

मध्यंतरी केंद्र सरकारने पिटबुल, जर्मन शेफर्ड, रॉटवेलरसह विविध २३ जातींच्या हिंस्र कुत्र्यांच्या विक्रीवर व प्रजननावर बंदी घालण्याचे परिपत्रक जारी केले होते. मात्र, या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल झाल्यावर न्यायालयाने त्‍यास स्थगिती दिली होती.

याविषयी पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना विचारले असता ते म्हणाले की, हिंस्र कुत्र्यांच्या बंदीवरील निर्णयाला न्‍यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी झालेली नाही. त्‍यामुळे आम्ही बंदी आणू शकत नाही. राहिला प्रश्‍‍न श्‍‍वानप्रेमींचा. त्‍यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम सुरूच आहे. परंतु, निर्बीजीकरण केल्यानंतर कुत्र्यांना त्याच जागी पुन्हा आणून सोडणे बंधनकारक असते. कारण प्राण्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे, असे ते म्‍हणाले.

दोन वर्षांत २ हजारांपेक्षा अधिक रुग्‍णांवर उपचार

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात कुत्र्याने चावे घेतलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असून गेल्या दोन वर्षांत २ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केल्याची नोंद इस्पितळात झाली आहे. यात २०२३ साली १२१७ तर २०२४ साली ११२७ चावी घेतलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे फोंडा परिसरात कुत्र्याने चावे घेण्‍याच्‍या प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT