Stray Dogs On Goa Beach canava
गोवा

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Stray Dogs On Goa Beach: बाणावलीत अमेरिकन महिलेसह तिघांवर हल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोव्यातील बाणावली येथील समुद्र किनाऱ्यावर भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून अनेकांचा या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात एक अमेरिकन महिला, तीन पर्यटक आणि दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. त्‍यामुळे येथील समुद्र किनारे पर्यटकांसाठी असुरक्षित झाले आहेत.

दृष्टीच्या म्हणण्यानुसार पहिल्या घटनेत अमेरिकेमधील ५६ वर्षीय महिला पर्यटक बाणावली किनाऱ्यावर फिरत असताना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. यानंतर लाईफसेव्हर्सनी तिच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले.

पीडितेने खासगी वाहनाने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या घटनेत याच समुद्रकिनाऱ्यावर गाझियाबाद आणि मुंबई येथील दोन देशी पर्यटकांचा व अन्य दोन महिलांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.

या ठिकाणी गस्त घालणाऱ्या जीवरक्षकांनी जवळच्या लाइफसेव्हर टॉवरशी संपर्क साधला व ही घटना त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. जखमी महिलांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाणावली, कोलवासह येथील अन्य समुद्र किनारेही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांसाठी हॉटस्पॉट बनले आहेत. मे महिन्यात येथे सायकल चालविताना २४ वर्षीय रशियन महिलेला चावा घेतला होता तर लोटली येथील एका स्थानिक महिलेचा चावा घेतला होता.

कोलवा समुद्रकिनारी सकाळी धावताना कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एका ज्येष्ठ नागरिकालाही हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shukra Gochar 2025: पैशांचा पाऊस पडणार! शुक्र गोचरामुळे बदलणार 'या' राशींचे आयुष्य

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: होंडा आयडीसी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT