Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

Viral Video: बीचवर जवळपास दहा ते पंधरा भटके कुत्रे फिरताना दिसत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडिओ गोव्यातला असल्याचा दावा केला जात आहे.

Pramod Yadav

पणजी: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात बदल करण्यात आला. यानंतर भटक्या कुत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा दावा केला जात असून, कोर्टात केस जिंकल्यानंतर कुत्र्यांनी विजयी मोर्चा काढल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

समुद्रकिनाऱ्यावर जवळपास दहा ते पंधरा भटके कुत्रे फिरताना दिसत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडिओ गोव्यातला असल्याचा दावा केला जात आहे. पण, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘कोर्टात केस जिंकल्यानंतर गोवा पार्टी तर बनतेच,’ असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत.

अनेकांनी कोर्टात केस जिंकल्यानंतर गोव्याची एक ट्रीप व्हायलाच पाहिजे, अशी कमेंट केली आहे. तर काही जणांनी डॉगेश भाई, अशी कमेंट केली आहे. ‘रोला है डॉगेश भाई का’, ‘जलवा हे डॉगेश भाई का’, अशा कमेंट देखील अनेकांनी केल्या आहेत. एकाने डॉगेश लोकांनी विजयी मोर्चा काढला आहे, अशी कमेंट केली आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाला आहे.

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांची रवानगी निवारा केंद्रात करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशात बदल करुन भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, निर्बीजीकरण करुन त्यांना मूळ त्याच जागेत सोडण्यात यावे. अधिक हिंस्त्र आणि रेबीजची लक्षणे दाखवणाऱ्या कुत्र्यांना मात्र सार्वजनिक ठिकाणी सोडण्यात येऊ नये, असा सुधारीत आदेश न्यायालयाने दिला.

याशिवाय कोर्टाने भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाण्यास टाकू नये, यासाठी महानगर पालिकेने काही जागा निश्चित करुन त्या ठिकाणी कुत्र्यांना खाण्यास टाकावे, असे आदेश दिले. निश्चित केलेल्या जागे व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी खाद्य टाकल्यास कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

Test Record: विराट की पुजारा? 103 कसोटीनंतर कुणाचा रेकॉर्ड आहे खास; वाचून वाटेल आश्चर्य

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

SCROLL FOR NEXT